शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

बिनविरोध निवडणुकांमागेही राजकारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 02:06 IST

नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून पंचवटी, नाशिक पूर्व व सातपूर या तीन ठिकाणी भाजपाला संधी ...

ठळक मुद्देप्रभाग समिती निवडणूक: जयश्री खर्जुल, वैशाली भोसले, धिवरे यांची बाजी

नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून पंचवटी, नाशिक पूर्व व सातपूर या तीन ठिकाणी भाजपाला संधी मिळाली आहे तर शिवसेनेकडे सिडको आणि नाशिकरोडला संधी मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पश्चिम प्रभाग समितीवर सत्ता मिळाली आहे. शिवसेनेने भाजप आणि कॉग्रेस, राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यासाठी केलेली खेळी सातपूरला अयशस्वी ठरली असली तरी नाशिकरोड येथे मात्र भाजपाने ज्या डॉ. सीमा ताजणे यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षादेश झुगारून माघार घेतल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आॅनलाईन पध्दतीने झालेल्या निवडणूकीत तीन प्रभाग समिती सभापती अगोदरच एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवडले गेले होते. यात नाशिक पूर्व मध्ये भाजपाचे अ­ॅड. श्याम बडोदे, पंचवटी प्रभागात याच पक्षाच्या शीतल माळोदे आणि सिडको प्रभाग समितीत चंद्रकांत खाडे यांच्या औपचारीक निवडीची घोषणा गुरूवारी (दि.१५) पार पडली. उर्वरीततीन ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदी मनसेच्या अ­ॅड. वैशाली भोसले, नाशिकरोडला जयश्री खर्जुल यांची निवड करण्यात आली आहे.महापौरपदाच्या निवडणूकीचे आणि आगामी महापालिकेच्या निवडणूकांचे सावट असलेल्या या निवडणूकीत अवघे पाच महिने कालावधीसाठी फार स्पर्धा नसली तरी राजकारण मात्र जोरात चालले. महापालिकेच्या राजीव गांधी भवनातून संचलीत या निवडणूकीत त्याचा प्रत्यय आला.नाशिकरोड प्रभाग समितीत शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी अकरा अकरा नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेला सत्ता मिळू शकणार होती. आता शिवसेनेत असलेले भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थक मानल्या जाणा-या डॉ.सीमा ताजणे तसेच मीरा हांडगे या भाजपाकडून इच्छुक होत्या. वाद आणि फुट टाळण्यासाठी भाजपने डॉ. सीमा ताजणे यांना उमेदवारी दिली. इतकेच नाही तर त्यांच्या नावाचा पक्षादेश देखील काढला होता. मात्र उमेदवारी मिळालेल्या डॉ. सीमा ताजणे यांनीच माघार घेतल्याने शिवसेनेच्या जयश्री खर्जुल बिनविरोध निवडून आल्या. अर्थात, हे वरकरणी राजकारण दिसत असलेतरी जगदीश पवार यांना आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू होते. त्यातही हांडगे यांच्यासाठी काही नेते प्रयत्न करीत होते.पवार यांना वळविणे शक्य न झाल्याने ऐनवेळी म्हणजे निवडणुूकीसाठी सभागृहात जाताना ताजणे यांना उमेदवारी देण्यात आल्याचा मॅसेज देण्यात आला. त्यातच विशाल संगमनेरे हे विदेशात असल्याने आॅनलाईन निवडणूकीत सहभागी होण्यात अडचण येत होती. त्यामुळे डॉ. ताजणे यांनी माघार घेतल्यचे समजते. त्यांची माघार पक्षाला सांगूनच झाल्याचा दावा गटनेता जगदीश पाटील यांनी केला आहे.पश्चिम प्रभागात भाजपचे वर्चस्व नसून तेथे कॉँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे अधिक सदस्य आहेत. या प्रभागात मनसेच्या अ­ॅड. वैशाली भोसले, भाजपाच्या स्वाती भामरे आणि कॉँग्रेसच्या मावळत्या सभापती वत्सला खैरे इच्छुक होत्या. शिवसेनेने अ­ॅड. भोसले यांना पाठींबा दिला होता. कारण त्यांनी महापौरपदाच्या निवडणूकीत सेनेला अखेरपर्यंत साथ दिल्याने त्यांना समर्थन दिले होते. मनसेकडूनही अ­ॅड. भोसले यांनाच समर्थन देण्यात आल्याने त्यांचा विजय सहज झाला. भामरे आणि खैरे यांना माघार घ्यावी लागली.सातपूरमध्ये भाजपाच्या मित्रपक्षाच्या दीक्षा लोंढे यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने खेळी करण्याचा प्रयत्न केला होता. याठिकाणी भाजपचेरविंद्र धिवरे आणि मनसेचे योगेश शेवरे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, मनसेने भाजपाच्या धीवरे यानां पाठींबा दिल्याने बहुमत नसताना देखील ही समिती भाजपाकडे गेली तर शिवसेनेच्या या आधी हातात असलेली समिती गेली. लोंढे आणि शेवरे यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक देखील बिनविरोध झाली. निवडणूक आॅनलाईन तरीही प्रत्यक्ष उपस्थिती कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रथमच आॅनलाईन पध्दतीने निवडणूका घेण्यातआल्या. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची गर्दी टाळण्यसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, निवडणूकीत सहभागी होताना तांत्रीक अडचणी आणि लिंक जोडण्यातील अडचणी यामुळे अनेक नगरसेवक नियोजीत निवडणूकीत वेळी कार्यालयातदाखल झाले. काही सदस्य मात्र आॅनलाईनच निवडणूकीत सहभागी झाले.मनसेची टाळी सेनेला नाहीमनसेला पश्चिम प्रभागात पाठींबा देणाऱ्या शिवसेनेला सातपूर प्रभागात मनसेकडून पाठबळाची अपेक्षा होती. मात्र या पक्षाने भाजपाला साथ दिल्याने दीक्षा लोंढे यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे तेथे सेनेची खेळी वाया गेली. नाशिकरोडला मात्र सेनेचे राजकारण कामी आले. 

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक