नाशिक : मतदारयाद्यांचे वाटप व ईव्हीएमची तपासणीसाठी वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय पक्षांना नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीनंतर मतदानयंत्र व व्हीव्हीपॅटचे महत्त्व कळाले असून, शुक्रवारी प्रमुख राजकीय पक्षांनी थेट अंबडच्या वेअरहाउसमध्ये पहिल्यांदाच हजेरी लावून व्हीव्हीपॅट यंत्राची हाताळणी व प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे शनिवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यंत्राबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.निवडणूकप्रक्रिया पारदर्शी व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कार्यक्रम, उपक्रमात वेळोवेळी राजकीय पक्षांना सामावून घेण्याची भूमिका घेतली जात असली तरी, राजकीय पक्षांची उदासीनताच नेहमीच स्पष्ट झाली आहे. प्रारूप मतदारयाद्या राजकीय पक्षांना अवलोकनासाठी देण्याचे ठरवूनही या याद्या घेण्यास राजकीय पक्षांकडून चालढकल केली जाते त्याचबरोबर जिल्ह्याला प्राप्त झालेले नवीन ईव्हीएम यंत्राच्या ताब्यात घेताना राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे विनंतीपत्र पाठवूनही एकही पक्षाने त्याबाबत उत्सुकता दर्शविली नाही. एवढेच नव्हे तर ईव्हीएम यंत्राची तपासणी राजकीय पक्षांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविण्यात आलेले असताना महिनाभर एकाही प्रतिनिधीने हजेरी लावली नाही. आता मात्र पाच राज्यांतील निवडणुकीत आयोगाने व्हीव्हीपॅटचा वापर केल्यामुळे निवडणुकीतील व मतदान यंत्राबाबतचा संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे. परिणामी शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रात्यक्षिकासाठी मतदानयंत्रे व व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात येणार असल्याने राजकीय पक्षांनी त्यासाठी उपस्थित रहावे, असे पत्र निवडणूक शाखेकडून देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजताच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाउस येथे हजर होते. यावेळी निवडणूक शाखेकडून त्यांना व्हीव्हीपॅटचा वापर, हाताळणीबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले त्याचबरोबर त्यासंदर्भातील शंका-कुशंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय अधिकाºयांना यंत्राचे वाटप करण्यात आले. दि. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी याकालावधीत प्रत्येक मतदारसंघातील मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे मिसाळ, तहसीलदार गणेश राठोड, नायब तहसीलदार अमित पवार, समीर भुजबळ, जयंत जाधव, अपूर्व हिरे, रवींद्र पगार, दिलीप खैरे, रमेश पवार, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
राजकीय पक्षांना कळाले व्हीव्हीपॅटचे महत्त्व !
By श्याम बागुल | Updated: December 14, 2018 18:40 IST
निवडणूकप्रक्रिया पारदर्शी व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कार्यक्रम, उपक्रमात वेळोवेळी राजकीय पक्षांना सामावून घेण्याची भूमिका घेतली जात असली तरी, राजकीय पक्षांची उदासीनताच नेहमीच स्पष्ट झाली आहे. प्रारूप मतदारयाद्या राजकीय पक्षांना अवलोकनासाठी देण्याचे ठरवूनही या
राजकीय पक्षांना कळाले व्हीव्हीपॅटचे महत्त्व !
ठळक मुद्देहजेरी : मतदारसंघांमध्ये आजपासून जनजागृती