शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी नाट्याचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:19 IST

जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून  विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पर्याय आजमवलेला दिसतो आहे. 

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्याचून प्रसिद्धीचे राजकारणबैठकांमध्ये विकासकामांपेक्षा मानपमानवर अधिक चर्चा

नाशिक : जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून  विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पर्याय आजमवलेला दिसतो आहे. गेल्या महिन्यांपासून काही वेगवेगळ्या विभागाच्या सभापतींनी त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने त्यांना योग्य तो मान सन्मान न दिल्याची तक्रार करून संबधित विषय समितीची सभा, स्थायी समितीची सभा  आणि कधी कधीतर चक्क तीन महिन्यांनी होणारी सर्वसाधारण सभाही वेठीस धरल्याचे पाहायला मिळत आहे. यात वेगवेगळ्या विषय समितींकडून अधिकाऱ्यांकडून संबधित विभागाची माहिती मिळत नसल्याचे तक्रार करीत असतात. प्रत्यक्षात अशा सभा झाल्यानंतर संबधित अधिकारी हे सभापतींच्या दालनात त्यांच्याकडील माहिती घेऊन हजर होत असताना ही नाराज्य नाट्याची रणनिती का असा सवाल प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षात नोटबंदीच्या काळात जिल्हा परिषदेच्या निधी जिल्हा बँकेत अडकून पडल्याने कोणचेही विकास कामे होऊ शकले नव्हते. आता कुठे विकास कामांचा आराखडा तयार होत असचाना अद्याप निधी वाटपावरूनच गोंधळ सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गटात आणि जिल्ह्यात विकास कामे दाखवता येत नसल्याने वेगवेगळ्या विषयांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची असे राजकारण सध्या जिल्हापरिषदेत रंगते आहे. याच कृषी पुरस्काराला आमंत्रित न केल्यामुळे उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नाराजी नाट्यासह, कुपोषण निमूर्लन पुरस्काराची माहिती न दिल्यामुळे सभापती अर्पणा खोसकर यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि आता मनिषा पवार यांनी अधिकारी माहिती देत नसल्यामुळे रोष व्यक्त करीत सर्वसामान्यांच्या विकासासंबंधी नियोजन व विचार विनिमय करण्याचा वेळ आपल्या मानपमानाच्या लेखाजोखा कधी विषय समितीत तर स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेत मांडून प्रकाश झोतात राहण्याचे राजकारण सुरू केले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद