शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जिल्ह्यात सहा लाख बालकांना पोलिओचे डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:22 IST

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना रविवारी (दि़ ११) पोलिओचे डोस पाजण्यात आले़ नाशिक महापालिका क्षेत्रात १ लाख ४६ हजार ३८३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ हजार ३८७, ग्रामीण भागात ३ लाख ९३ हजार ५२१ तर नगरपालिका क्षेत्रात ५१ हजार ८७८ असे एकूण ६ लाख ४४ हजार १६९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़

ठळक मुद्देपल्स पोलिओ मोहीम : जिल्ह्यात ८४ टक्केवारी; शहरात १ लाख ४६ हजार डोस

‘पल्स पोलिओ एक लसीकरण’ मोहिमेंतर्गत शहरातील सीबीएस बसस्थानकावर प्रवासी बालकांना पोलिओचा डोस देताना आरोग्य विभागाच्या महिला प्रतिनिधी.

 

 

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना रविवारी (दि़ ११) पोलिओचे डोस पाजण्यात आले़ नाशिक महापालिका क्षेत्रात १ लाख ४६ हजार ३८३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ हजार ३८७, ग्रामीण भागात ३ लाख ९३ हजार ५२१ तर नगरपालिका क्षेत्रात ५१ हजार ८७८ असे एकूण ६ लाख ४४ हजार १६९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते बालकाला पोलिओ डोस पाजून शुभारंभ करण्यात आला़ यावेळी प्रभाग सभापती श्रीमती शाहीन मिर्झा, नगरसेविका अर्चना थोरात, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते पांढुर्ली येथे लहान बालकास पोलिओचा डोस पाजून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या मोहिमेचा शुभारंभ केला़ यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाक्चौरे उपस्थित होते़ तर जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे, जागतिक आरोग्य संघटनेचे राज्यस्तरीय सर्वेक्षर वैद्यकीय अधिकारी डॉ़ कमलाकर लष्करे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़ जिल्ह्यातील शून्य ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित ७ लाख ७४ हजार ५५३ बालकांना पोलिओ लस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.नाशिक महापालिका क्षेत्रातील १ लाख ८६ हजार ८४५ पैकी १ लाख ४६ हजार ३८३ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. नाशिक ग्रामीणमधील ४ लाख १४ हजार ९६ बालकांपैकी ३ लाख ९३ हजार ५२१ बालकांना, नगरपालिका क्षेत्रातील ५१ हजार ३४९ पैकी ५१ हजार ८७८ बालकांना तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील १ लाख १९ हजार ३१९ बालकांपैकी ५२ हजार ३८७ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ पोलिओ लसीकरणासाठी जिल्ह्यात ४ हजार ४२९ बूथ उभारण्यात आले होते. सोमवारपासून तीन ते पाच दिवस ३ हजार ५२२ पथकांद्वारे उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत़ जिल्ह्यातील पोलिओडोसची टक्केवारीबागलाण ९५, चांदवड ९४, देवळा १००, दिंडोरी ९६, इगतपुरी ९७, कळवण ९९, मालेगाव ९२, नाशिक ९८, नांदगाव ९३, निफाड ९३, पेठ ९०, सिन्नर ९६, सुरगाणा ८७, त्र्यंबकेश्वर ९४, येवला ९३.जिल्हा परिषदअंतर्गत : ९४,नगरपालिका क्षेत्र : १००़६३ नाशिक महापालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरण सातपूर ४२२४, संजीवनगर ५३१५, आर.सी.एच. केंद्र गंगापूर ८३०७, एमएचबी कॉलनी ४६६८, सिडको ४३८५, अंबड ४७५४, मोरवाडी ४९६३, कामटवाडे ३८८१, पवननगर ५००३, पिंपळगाव खांब ५३४९, नाशिकरोड ५५८०, विहितगाव ३८०५, सिन्नर फाटा ५०११, गोरेवाडी २७७५, दसक पंचक ४९७१, उपनगर ४८६८, बजरंगवाडी ४७२९, भारतनगर ४७५५, वडाळागाव ४१६४, जिजामाता ३८३३, मुलतानपुरा ४७२५, जिल्हा शासकीय रुग्णालय ७७५८, रामवाडी ३८७३, रेडक्रॉस ३७१४, मायको दवाखाना पंचवटी ४९८४, म्हसरूळ, मखमलाबाद ५०२६, तपोवन ४६२३, हिरावाडी ४८१०.