शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रणगाडा बसविण्याचे काम पोलीस बंदोबस्तात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:09 IST

येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सिडकोचे प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा बसविण्याच्या कामास एका नगरसेवकाचा विरोध तर दुसऱ्याचे समर्थन असा प्रकार असल्याने या कामात कोणाचा अडथळा येऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांनी रणगाड्याचे काम हे पोलीस बंदोबस्तात करण्याचा निर्णय घेतला

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सिडकोचे प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा बसविण्याच्या कामास एका नगरसेवकाचा विरोध तर दुसऱ्याचे समर्थन असा प्रकार असल्याने या कामात कोणाचा अडथळा येऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांनी रणगाड्याचे काम हे पोलीस बंदोबस्तात करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. यामुळे आता रणगाडा बसविण्यास जागेची अडचण असल्याचे कारण सांगत विरोध करणाºया याच प्रभागाचे माजी नगरसेवक व याचिकाकर्ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लेखानगर येथे भारत-पाकिस्तान युद्धात वापरण्यात आलेला रणगाडा बसविण्याचा प्रस्ताव नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी मांडला होता. या प्रस्तावास महानगरपालिकेने मंजुरीसुद्धा दिली असून, बांधकाम व्यावसायिकाच्या सीएसआर फंडातून हा रणगाडा उभारण्याचे काम करण्यात येणार होते. मात्र महामार्गालगत असलेल्या समांतर रस्ता आधीच अरुं द असून, या रस्त्याच्या नियोजनात अनेक चुका झाल्या असल्याने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. महामार्गालगतच्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतरच उरलेल्या जागेत रणगाडा बसवण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्ते अजिंक्य चुंबळे यांनी केली आहे. मात्र, यासंदर्भात तिदमे यांनी विरोध टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात सदरचे काम करावे, ही केलेली मागणी आयुक्त गमे यांनी मान्य केली आहे. यासाठी पोलीस आयुक्तांना लेखी पत्राद्वारे बंदोबस्ताची मागणी केली आहे.वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम एका बांधकाम व्यावसायिकाच्या सीआरएस फंडातून करण्यात येणार आहे.लेखानगर येथे रस्ता अरुं द झाल्याने अपघातात वाढ झाली आहे. रणगाडा बसविण्याला विरोध नाही, परंतु चौकातील रस्ता रुं दीकरण झाल्यानंतर जागा उरली तर रणगाडा बसवावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे नियोजन करताना केलेल्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या चुकीमुळे सर्वसामान्यांचे बळी जात असताना त्याचठिकाणी चौक सुशोभीकरणाचा प्रस्ताव देऊन नागरिकांचा जीव अधिक धोक्यात घालण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.- अजिंक्य चुंभळे, याचिकाकर्तेसिडकोतील प्रभाग क्रमांक २४ लेखानगर येथे भारत-पाकिस्तानच्या युद्धात वापरण्यात आलेला रणगाडा बसविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. हे काम गुरुवार (दि.१९) पासून सुरू होेणार आहे. यामुळे सिडकोच्या सौंदर्यात भर पडणार आहे.- प्रवीण तिदमे, नगरसेवक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिस