शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:26 IST

आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन गत साडेतीन वर्षांपासून मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (रा. मंजुळा मंगल कार्यालयामागे, नाशिकरोड) हा बलात्कार करीत असल्याची फिर्याद जेलरोड परिसरातील शिक्षिका तसेच शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे़

नाशिकरोड : आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन गत साडेतीन वर्षांपासून मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (रा. मंजुळा मंगल कार्यालयामागे, नाशिकरोड) हा बलात्कार करीत असल्याची फिर्याद जेलरोड परिसरातील शिक्षिका तसेच शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे़ याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित उपनिरीक्षक सानपविरोधात विनयभंग, बलात्कार तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़दरम्यान, पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर सानप याने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़ २७)घडली आहे़उपनगर पोलीस ठाण्यात पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार या महिलेचा पती मुंबईत पोलीस दलात असताना संशयित साजन सानपही तिथे नियुक्तीस होता.  पीडित महिला व सानप हे जेलरोड परिसरातच राहत असल्याने पतीमुळे या दोघांची ओळख झाली. एप्रिल २०१४ मध्ये घरात स्वयंपाक करताना महिला जखमी झाल्याने तिला पाहण्यासाठी सानप तिच्या घरी आला होता़ यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले होते, त्यातच काही कारणावरून सानपने महिलेला तिच्या पतीविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न केला. तसेच पतिविरुद्ध पुरावा देण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेशी जवळीक साधली. माझ्या मनासारखी वागली नाहीस तर फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची धमकी दिली़ साडेतीन वर्षे अशाप्रकारे त्याने या महिलेवर अत्याचार केले. याप्रकरणी महिलेने पतीसोबत उपनगर पोलीस ठाणे गाठून सोमवारी (दि़२६) फिर्याद दिली़उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (३७) याने मंगळवारी (दि़ २७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली़ मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत साजन सानप हे पुण्याहून शिवाजीनगरकडे जात असताना अचानक रेल्वेसमोर जाऊन उभे राहिले. यामध्ये रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही आत्महत्या नसून अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू