नाशिकरोड : जेलरोड कोठारी कन्या शाळेजवळ वाहतूक पोलीस हेल्मेट व वाहन तपासणी करीत असताना दुचाकीवर बसलेल्या तिघा जणांना अडविल्यावरून त्यांनी शिवीगाळ करत वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली.वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई गौरव बन्सीधर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जेलरोड कोठारी कन्या शाळेजवळ मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत हेल्मेट, ट्रीपलसिट, फॅन्सी नंबरप्लेट व इतर केसेस करण्यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी कारवाई करत होते. यावेळी जेलरोडकडून बिटकोकडे सुझुकी मोटारसायकलवर (एमएच १५, जीझेड ११८) ट्रीपलसिट जाणाऱ्या दुचाकीला अडविले. त्याचा राग आल्याने चेतन किशोर बगेला, पुरुषोत्तम किशोर बगेला, किशोर बच्चनलाल बगेला रा. गोसावीनगर उपनगर यांनी वाहतूक पोलिसाशी वाद घालून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
दुचाकी अडविल्याने पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:03 IST