शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील दोन बहिणींच्या पॉकेटमनीतून पोलीसांना सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:14 IST

कोरोना विरोधातील लढ्यात पोलीस महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितताही गरजेची आहे. हीच गोष्ट ओळखून नाशिकच्या आदिया आणि आर्या राज लोनसाने या दोघा बहिणीनी आपल्या पॉकेटमनीतून पोलिसाना फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनेटायझर यासारख्या साहित्याची मदत करून सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे. 

ठळक मुद्देविद्यार्थीनींकडून पोलिसांना सुरक्षा साहित्याची मदतदोन बहिनींकडून सव्वा लाख रुपयांचे सुरक्षा साहित्य भेट

नाशिक : कोरोना विषाणू विरूद्धच्या लढ्यात पोलीस महत्वाचा घटक आहे.  त्यामुळे त्यांची सुरक्षितताही गरजेची आहे. हीच गोष्ट ओळखून नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमीत शिकणाऱ्या आदिया आणि आर्या राज लोनसाने या दोघा बहिणीनी आपल्या पॉकेटमनीतून पोलिसाना फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनेटायझर यासारख्या साहित्याची मदत करून सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे. कोरोना विषाणू विरूद्धच्या लढाईत सामान्य नागरिकांचा कोरोनापासून बचाव करतांना पोलिसांना मात्र कोरोनाची लागण होत असून काहींचा मृत्यूही झाला आहे.  ही गोष्ट लक्षात घेऊन आदिया आणि आर्या या दोन बहीणींनी त्यांचा संपूर्ण पॉकेटमनी पोलिसांसाठी खर्च करण्याचे ठरविले. यातून त्यांनी कोरोनापासून बचावासाठी आवश्यक एक हजार एन ९५ मास्क,  शंभर फेस शिल्ड आणि ५५ फेस शिल्ड असे एकूण एक लाख पंचवीस हजारांहून अधिक किंमतीचे साहित्य नाशिक पोलीसांना उपलब्ध करून देत शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड आदी भागात या साहित्याचे वाटप केले. दरम्यान, आदिता आणि आर्या या दोन्ही बहिनींना मिळणाऱ्या पॉकेटमनीतून बचत करून त्यांना हवी असलेली वस्तू खरेदी करण्याची सवयी आहे. परंतु, सध्या आता कोरोनामुळे सगळेच बदलले असून रोजच पोलीसांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आपली काळजी घेणाऱ्या पोलीसांची मदत करण्याचा विचार सुचला  आणि त्यातून पोलीस काकांसाठी मास्क, फेस शिल्ड आणि सॅनिटाजरचे गिफ्ट केल्याची प्रतिक्रिया अदिता आणि आर्या  यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकNashikनाशिकStudentविद्यार्थीPoliceपोलिस