शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कळवण पोलिसांकडून २८४ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 19:32 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्चपासून ३ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन सुरु असून या काळात कळवण पोलिसांनी २८४ दुचाकी जप्त करु न ८३ हजाराची दंड आकारणी केली आहे. दरम्यान, गावठी दारु तयार करणे व विक्र ी करणा-या १० जणांवर गुन्हे दाखल करून ८४ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलीस कारवाईचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्दे ८३ हजाराचा दंड वसूल :विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

कळवण : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्चपासून ३ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन सुरु असून या काळात कळवण पोलिसांनी २८४ दुचाकी जप्त करु न ८३ हजाराची दंड आकारणी केली आहे. दरम्यान, गावठी दारु तयार करणे व विक्र ी करणा-या १० जणांवर गुन्हे दाखल करून ८४ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलीस कारवाईचे स्वागत केले आहे.सध्या लॉकडाऊन कालावधी सुरु असून पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावत असून कोरोना विषाणूचे गांभीर्य नसलेल्या नागरिकांवर शासनाच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी कळवण पोलिसांनी कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाशी संघर्ष करून या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. पोलिस प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलेल्या आवाहनाला न जुमानता संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी १८८ प्रमाणे ५५ जणांवर ३३ गुन्हे दाखल केले आहेत . तसेच लॉकडाऊन कालावधीत बेकायदेशीर गावठी दारु तयार करणे व विक्र ी करणा-या १० जणांवर गुन्हे दाखल करून ८४ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .संचारबंदी काळात रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहनचालकांच्या २८४ दुचाकी व ६ चारचाकी वाहने जप्त करून ८३ हजार रु पयांचा दंड वसूल केला आहे .पोलीस प्रशासनाने सौजन्याची व सहकार्याची भूमिका घेऊन अत्यावश्यक कामांसाठी सवलत दिलेली आहे. तरीही लोक हेतूपुरस्कर कायद्याचे उल्लंघन करून कारवाई करण्यास प्रवृत्त करीत आहेत . पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे ,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकम, सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस हवालदार मधुकर तारु , निकम, कडाळे, रायसिंग जाधव ,सचिन राऊत, शिवाजी शिंदे, सुरेश पवार पथकाने कारवाईत सहभाग घेत कायद्याचे पालन न करणा-यांवर कारवाई केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी