शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
2
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
3
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
4
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
5
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
6
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
7
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
8
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
9
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
10
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
11
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
12
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
13
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
14
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
15
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
16
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
17
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
18
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
19
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
20
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

पेट्रोल बॉम्ब शोधणारा स्निफर स्पाइक श्वानाला पोलिसांचा सॅल्यूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:39 IST

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकातील ह्यस्निफर स्पाइकह्ण हे श्वान पेट्रोल बॉम्ब शोधक म्हणून प्रसिद्ध होते. स्पाइकह्णचे वयोमान आणि त्याने पूर्ण केलेली ११ वर्षांची प्रदीर्घ सेवा लक्षात घेता बीडीडीएस पथकाने या आपल्या प्रिय साथीदाराला सन्मानाने सेवानिवृत्त केले. सजविलेल्या पोलीस वाहनाच्या बोनेटवर बसवून लाडक्या स्पाइकला छोटेखानी मिरवत पोलिसांनी ह्यसॅल्यूटह्ण केला. तसेच त्याच्या वाढदिवसानिमत्त केकदेखील कापण्यात आला.

ठळक मुद्दे११वर्षांनंतर सेवानिवृत्त : सन्मानाने सजविलेल्या पोलीस वाहनातून लाडक्या श्वानाला मिरविले

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकातील ह्यस्निफर स्पाइकह्ण हे श्वान पेट्रोल बॉम्ब शोधक म्हणून प्रसिद्ध होते. स्पाइकह्णचे वयोमान आणि त्याने पूर्ण केलेली ११ वर्षांची प्रदीर्घ सेवा लक्षात घेता बीडीडीएस पथकाने या आपल्या प्रिय साथीदाराला सन्मानाने सेवानिवृत्त केले. सजविलेल्या पोलीस वाहनाच्या बोनेटवर बसवून लाडक्या स्पाइकला छोटेखानी मिरवत पोलिसांनी ह्यसॅल्यूटह्ण केला. तसेच त्याच्या वाढदिवसानिमत्त केकदेखील कापण्यात आला.नाशिक बॉम्बशोधक-नाशक पथकात २०१०साली तीन महिन्यांचे लॅब्रोडोर जातीचे हे प्रशिक्षित श्वान दाखल झाले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये स्पाइकचे वयोमान आणि सेवाकालावधी लक्षात घेता त्यास पोलीस सेवेतून मंगळवारी (दि.२३) सेवानिवृत्त करण्यात आले.छुप्या घातक स्फोटकसदृश वस्तू शोधण्यात तरबेज असलेल्या ह्यस्पाइकह्णने २०१५-१६साली नाशकात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी सुरक्षिततेच्यादृष्टीने रामकुंड, तपोवन, साधुग्राम या भागात पोलीस कर्मचाऱ्यांसह अहोरात्र सेवा बजावली. तत्पूर्वी २०१३-१४साली राजीव गांधी भवनसमोरील एका व्यापारी संकुलात एका अज्ञाताने ठेवलेला पेट्रोल बॉम्ब याच स्पाइकने शोधून काढला होता. तेव्हा तो अवघ्या तीन ते चार वर्षांचा होता. तसेच शहरातील रेल्वेस्थानक असो किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असो, अशा प्रत्येकवेळी ते ठिकाण पूर्णपणे ह्यस्पाइकह्ण पिंजून काढत होता.

काळाराम मंदिराच्या परिसरात नेहमीच या श्वानाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह हजेरी लावून परिसराची चाचपणी केली आहे. लॅब्रोडर स्पाइकला पुढील कायमस्वरूपी संगोपनाकरिता मागील दहा वर्षांपासून त्याचा संभाळ करणारे श्वान हस्तक पोलीस गणेश हिरे यांना सोपविण्यात येणार आहे. अत्यंत शांत स्वभावाचे हे श्वान इतर लॅब्रोडोर जातीच्या श्वानाप्रमाणे नाजूक नसून अत्यंत कठोर परिश्रम घेणारे कष्टाळू श्वान असल्याचे बीडीडीएसचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सांगितले.---इन्फो--राष्ट्रपती दौरा ते मोदींच्या सभेत भूमिकाराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नाशिक दौरा असो किंवा त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनात झालेली जाहीरसभा असो अशा या दोन्ही महत्त्वांच्या कार्यक्रमाप्रसंगी सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्यस्पाइकह्ण श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावली होती....अन‌् रेल्वेच्या सुरक्षेसाठी ह्यस्पाइकह्णची धावदीड वर्षांपूर्वी एका रेल्वेत बॉम्बसदृश वस्तू असल्याचा ह्यकॉलह्ण पथकाला मिळाला होता. यावेळी इगतपुरी रेल्वेस्थानकावर संशयित एक्स्प्रेस रेल्वे गाडी थांबवून रेल्वेचा कानाकोपरा बॉम्ब शोधक नाशक पथकाने या श्वानाच्या साहाय्याने पिंजून काढला होता. सुदैवाने रेल्वेत कोठेही स्फोटकसदृश वस्तू आढळून आली नव्हती.फोटो आर वर २३डॉग१/२/३

टॅग्स :dogकुत्राPoliceपोलिस