शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

८३ संशयितांना बेड्या :गुटखा-मटका मुक्त उत्तर महाराष्ट्रासाठी पोलीस सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 19:53 IST

पोलिसांनी या कारवायांमध्ये एकुण ३ कोटी ४८ लाख १४ हजार ४९० रुपयांचा गुटखा तसेच दुचाकी, चारचाकींसारखे नऊ वाहने जप्त केली आहेत. या पाचही जिल्ह्यांत चोरी-छुप्या पध्दतीने ग्रामीण भागात होणारी गुटख्याची विक्री पुर्णपणे थांबवून गुटखा मुक्त उत्तर महाराष्ट्र करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींच्या गुटख्याच्या तस्करीला चाप

नाशिक : गुटखा अन‌् मटका मुक्त उत्तर महाराष्ट्र अभियान राबविण्याचे आदेशा नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनाला विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडून देण्यात आले आहे. याअंतर्गत मागील तीन महिन्यांत पाच जिल्ह्यांत ८३ संशयित आरोपींना गजाआड करत पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची गुटख्याची होणारी तस्करी रोखली आहे.राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानासुध्दा चोरट्या मार्गाने गुटख्याचा पुरवठा व विक्री सुरुच असल्याने तरुणाईचे आरोग्य धोक्यात आले आहे. बंदीचा नियम केवळ कागदावरच न राहता त्याची थेट अंमलबजावणी करत नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक ग्रामीण, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी आपआपल्या हद्दीत चोरट्या मार्गाने येणाऱ्या गुटख्याच्या पुरवठ्यावर ह्यब्रेकह्ण लावण्यासाठी सापळे रचले. नाशिक, जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक प्रत्येकी १९ तर अहमदनगरमध्ये १२, धुळे आणि नंदुरबारमध्ये ५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. अवैधरित्या गुटखा, सुगंधी तंबाखु, पानमसाला, मावा यांसारख्या तंबाखुजन्य पदार्थांची होणारी चोरटी वाहतुक रोखण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या कारवायांमध्ये एकुण ३ कोटी ४८ लाख १४ हजार ४९० रुपयांचा गुटखा तसेच दुचाकी, चारचाकींसारखे नऊ वाहने जप्त केली आहेत. या पाचही जिल्ह्यांत चोरी-छुप्या पध्दतीने ग्रामीण भागात होणारी गुटख्याची विक्री पुर्णपणे थांबवून गुटखा मुक्त उत्तर महाराष्ट्र करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसArrestअटक