शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:39 IST

जिल्ह्यातील पोलिसांनी एकत्र येत पोलीस दलासाठी स्थापन केलेल्या जिल्हा पोलीस क्रेडिट सहकारी सोसायटीकरिता ६९ वर्षांनंतर प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली.

पंचवटी : जिल्ह्यातील पोलिसांनी एकत्र येत पोलीस दलासाठी स्थापन केलेल्या जिल्हा पोलीस क्रेडिट सहकारी सोसायटीकरिता ६९ वर्षांनंतर प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. रविवारी (दि.२०) निवडणूक प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यात ६३.३२ टक्के मतदान झाले. शहरात एक हजार ९१८ तर जिल्ह्यात १ हजार ५३ असे एकूण २९७१ पोलीस सभासदांनी मतदान केले. संपूर्ण जिल्ह्यात २० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.  नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक यांचे यापूर्वी सोसायटीवर पूर्णपणे नियंत्रण असायचे. आता पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आल्याने निवडून आलेले पोलीस कर्मचारी संचालक म्हणून सोसायटीवर विराजमान होणार आहेत. सोसायटी स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक प्रक्रिया घेतली गेली. सुमारे ५१०० सभासद असलेल्या या निवडणुकीसाठी प्रगती परिवर्तन व सहकार हे तीन पॅनल रिंगणात होते. यामध्ये सर्वसाधारण दहा, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जागांसाठी प्रत्येकी एक तर महिला राखीव गटासाठी दोन अशा १५ जागांसाठी मतदान घेण्यात आले.निवडणूक रिंगणात शहर वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय महिला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच पोलीस अकादमी या विभागात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचा उमेदवार म्हणून समावेश करण्यात आलेला होता. पोलीस कर्मचारी पोलीस क्रे डिट को-आॅप. सोसायटीच्या निमित्ताने पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने पोलीस दलाचे लक्ष लागले होते. सोमवारी (दि.२१) मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. रविवारी सकाळी आरपी विद्यालय झालेल्या मतदानासाठी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. केंद्राबाहेर तीनही पॅनलचे बूथ लागलेले होते. तर मतदानासाठी येणाºया प्रत्येक मतदाराला पोलीस हात जोडून आपल्यालाच मतदान करण्याची विनवणी करीत असल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना सौंदाणे यांनी कामकाज पाहिले....अन् पोलिसांनी जोडले पोलिसांना हातएरवी पोलीस म्हटले तर बंदोबस्तात व्यस्त असल्याचे चित्र डोळ्यापुढे येते. पोलीस क्रे डिट को-आॅप. सोसायटीच्या निमित्ताने पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या निवडणुकीमुळे पोलीस कर्मचारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणेच किंबहुना त्यालाही लाजवेल, अशा देहबोलीद्वारे पोलीस कर्मचारी मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होते. आर.पी. विद्यालयाच्या प्रांगणात सकाळपासून दिवसभर पोलीस उमेदवार येणाºया मतदारांना हात जोडून विनवणी करीत होते.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक