शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून विमानतळ सुरक्षाव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:18 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांच्या सोमवारच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ओझर विमानतळावर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला, तर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रंगीत तालीम केली.

ठळक मुद्देराष्टÑपती दौरा : हेलिकॉप्टरची मांगीतुंगीला रंगीत तालीम

नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांच्या सोमवारच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ओझर विमानतळावर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला, तर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रंगीत तालीम केली. यावेळी महसूल अधिकाºयांनीही हजेरी लावली.जैन धर्मगुरु भगवान ऋषभदेव महाराज यांच्या मांगीतुंगी येथील तीर्थस्थळी सोमवारी विश्वशांती संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी राष्टÑपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करण्यात आले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्यासाठी हजेरी लावणार असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात असून, राष्टÑपतींचे सोमवारी दुपारी विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन होईल व तेथून ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रवाना होतील.राष्टÑपती कार्यक्रमाला येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काटेकोर काळजी घेण्यात येत असून, त्यासाठी दिल्लीहून विशेष सुरक्षा पथक तसेच राज्यातील विशेष सुरक्षा पथकाचे अधिकारी दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी ओझर विमानतळावर राज्याचे विशेष सुरक्षा महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान राष्टÑपतींसाठी हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरचे ओझरला आगमन झाले. त्यातील एका हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे भेट देऊन हवाई मार्गाची पाहणी केली.जिल्हा प्रशासनाकडे राष्ट्रपतींचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम प्राप्त झाला असून, त्यानुसार दुपारी पावणे दोन वाजता राष्टÑपतींचे ओझरला आगमन होईल. तत्पूर्वी पाच मिनिटांच्या अंतराने मुख्यमंत्री, राज्यपाल यांचे विमानाने आगमन होणार आहे. राष्टÑपती आल्यानंतर हवाई दलाच्या विमानाने ते मांगीतुंगी येथे रवाना होतील.साधारणत: साडेपाच वाजता राष्टÑपती मांगीतुंगीहून ओझरला व तेथून पुण्याकडे रवाना होणार आहेत. या दौºयासाठी सुमारे ४० शासकीय वाहनांचा ताफा असणार आहे.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षPoliceपोलिस