शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:59 IST

नाशिकरोड परिसरातील दत्तमंदिर व डॉ़ आंबेडकर पुतळ्यामागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी सोमवारी (दि़२६) सायंकाळी छापेमारी केली़ या प्रकरणी आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक : नाशिकरोड परिसरातील दत्तमंदिर व डॉ़ आंबेडकर पुतळ्यामागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी सोमवारी (दि़२६) सायंकाळी छापेमारी केली़ या प्रकरणी आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नाशिकरोडच्या दत्तमंदिर परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी संशयित सलीम गुलाब शेख (४९, रा. करमदास मार्केट, जेलरोड) व त्याचा साथीदार हे कल्याण मटका यावर पैसे लावून जुगार खेळत होते़ या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन हजार ८५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़नाशिकरोड येथील आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या न्यू सिंग सायकल दुकानामागील जुगार अड्ड्यावर सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी अनिल भास्कर पाटेकर (५४, रा. एव्हरशिट हौसिंग सोसायटी, लिंगायत कॉलनीजवळ, देवळालीगाव) व त्याचे पाच साथीदार आकड्यावर पैसे लावून मटका जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून ११ हजार ४३० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.म्हशीच्या पारडूची चोरीभद्रकालीतील घास बाजारातील रहिवासी अब्दुल कादिर अहमद (रा. भद्रकाली) यांच्या मालकीचे दोन वर्षांचे पारडू चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़२६) सकाळच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संशयित शकुर पीर कुरेशी (रा. चौक मंडई, बागवानपुरा, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़पाथर्डी फाट्यावरून दुचाकीची चोरीपाथर्डी फाट्यावरील माउलीनगरमधील रहिवासी समाधान गाडे यांची दुचाकी (एमएच १५, बीयू १७८१) चोरट्यांनी पाथर्डी फाट्यावरील लॉन्सजवळून चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बापूबंगला परिसरात संशयितास अटकइंदिरानगरमधील बापूबंगल्याजवळ घरफोडी अथवा चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेला संशयित सचिन पांडुरंग देवरे (३९, रा़ बडदेनगर, जुने सिडको) यास इंदिरानगर पोलिसांनी सोमवारी (दि़२६) मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली असून, या प्रकरणी मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी