शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फार्महाउसमध्ये पोलिसांचा छापा; आठ तलवारी, दोन चॉपर अन‌् फायटर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 17:32 IST

शस्त्रसाठ्याची एकुण किंमत सुमारे ३१ हजाार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या स्वत:च्या फार्महाउसमध्ये बेकायदेशीरपणे वरीलप्रकारे हत्यारे आढळून आली

नाशिक : शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे त्यांनी मखमलाबाद शिवारातील माळी वस्ती येथील एका फार्महाऊसवर धाड टाकली. तेथून आठ तलवारी, दोन चॉपर व फायटर अशा प्राणघातक हल्ल्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी रहिवासी संशयित प्रणील प्रकाश पठाडे (३२) यास पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हे शाखेचे नवनियुक्त उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सर्व गुन्हे शाखांचे युनीट व त्यांची पथके सतर्क करत शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कुठलीही गय करु नये असे फर्मान सोडले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकांनी आपले 'नेटवर्क' अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. या शस्त्रसाठ्याची एकुण किंमत सुमारे ३१ हजाार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या स्वत:च्या फार्महाउसमध्ये बेकायदेशीरपणे वरीलप्रकारे हत्यारे आढळून आली. यानुसार पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक विशाल काठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पठाडेविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यान्वये म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यास पोलिसांनी अटक करून म्हसरूळ पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक कारवाळ हे करीत आहेत.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCrime patrol Showक्राइम पेट्रोल