शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस चौक्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:15 IST

अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, टवाळखोरांचे उपद्रव याबरोबरच वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच बंद असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी मागील महिन्यात अंबड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितले, परंतु आजही परिस्थिती ‘जैसे थे’च असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही पोलीस चौक्या अद्यापही बंद असल्याने चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारीत वाढ : पोलीस आयुक्तांच्या आदेशालाच हरताळ

सिडको : अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, टवाळखोरांचे उपद्रव याबरोबरच वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच बंद असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी मागील महिन्यात अंबड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितले, परंतु आजही परिस्थिती ‘जैसे थे’च असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही पोलीस चौक्या अद्यापही बंद असल्याने चित्र बघावयास मिळत आहे.अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात मागील महिन्यात दोघा गुंडांनी पाणीपुरी विक्रेत्यास जबर मारहाण करीत दहशत पसरविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर गुंडागर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अंबड व सिडको भागांतील नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुंडागर्दी, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांबरोबरच उद्याने तसेच चौकांत वाढलेल्या टवाळखोरांचा उपद्रव, दारू दुकानांसमोरील मद्यपींकडून होत असलेला त्रास यामुळे सिडको व अंबड भागांतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याच्या सूचना नागरिक व लोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे मांडल्या होत्या. यावेळी पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई सुरू आहे, तसेच गुन्हेगारांना तडीपार करण्याबरोबरच काहींना एमपीडीए या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे परिसरात पुन्हा भुरट्या चोºया तसेच गुन्हेगारी वाढली असल्याने बंद पोलीस चौक्यांमध्ये कामयस्वरूपी पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्याबरोबरच पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.जुने सिडको परिसरातील पोलीस चौकी बंद असल्याने परिसरात भुरट्या चोºया वाढल्या असून, मोबाइल चोरीच्या प्रकारातही वाढ झाल्याने याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे.४प्रत्येक भागांतील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी सोशल पोलिसिंग सुरू असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले होते. तसेच अंबड पोलीस हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बंद असलेल्या पोलीस चौक्या कार्यान्वित करणार असल्याचे सांगितले होते. परंतु आजही महालक्ष्मीनगर भागासह खुटवडनगर या भागातील पोलीस चौक्या कायमच बंद असून, त्रिमूर्ती चौक व शिवाजी चौक येथील पोलीस चौकीत कधी कर्मचारी दिसत नसल्याचे अनेक वेळा आढळून येत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी