शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

फलकबाजी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांच्या नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:56 IST

सिडको : शिवजयंतीचे निमित्त साधत सिडकोतील मुख्य रस्ते तसेच चौकात जागोजागी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फलकबाजी केल्याने मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण झाले असून, अशा अनधिकृत फलकबाजी करणाऱ्या पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत पोस्टर बॉईज तसेच होर्डींग्ज छापणाऱ्या दुकान मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देसिडकोत विद्रुपीकरण : फलक तयार करणाऱ्यांवरही गुन्हे

सिडको : शिवजयंतीचे निमित्त साधत सिडकोतील मुख्य रस्ते तसेच चौकात जागोजागी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फलकबाजी केल्याने मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण झाले असून, अशा अनधिकृत फलकबाजी करणाऱ्या पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत पोस्टर बॉईज तसेच होर्डींग्ज छापणाऱ्या दुकान मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, स्टेट बँक चौक, संभाजी चौक, पाथर्डी फाटा, अंबड यासह मुख्य रस्ते तसेच रहदारीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे होर्डीग, बॅनर्स, पोस्टर्स तसेच स्वागत कमानी उभारून विद्रुपीकरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मनपा व पोलीस यंत्रणेवर टिका होत असल्याने आगामी काळात महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे फलकबाजी करणाऱ्यांवर तसेच फलक बनवून देणाऱ्या प्रिंटिंग प्रेस चालकावर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी पाच जणांना नोटीस दिल्या आहेत तर काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सिडकोत सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी विविध गट व राजकीय पक्षांचे तीन ते चार अध्यक्ष निवडण्यात आले असून, एकमेकांवर वर्चस्व दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फलकबाजी करण्यात आली आहे. त्यातून वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच वादातून तीन दिवसापूर्वी त्रिमूर्ती चौकात शहरातील काही युवकांनी येत एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली होती.पोलिसांकडून सिडको तसेच अंबड भागात लावण्यात आलेल्या फलकबाजी करणाऱ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची माहिती घेतली जात असून, त्यांच्या विरुद्ध यापुर्वी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी अंबड पोलिसांनी सुरू केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCrime Newsगुन्हेगारी