शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमवीरांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:57 IST

प्रेमाच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्यांसह शहरातील कायदा व सुव्यवसथा बाधित राखण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रेमीयुगुलांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणांवर किंवा कॅफेमध्ये अवैधरीत्या खोल्यांमध्ये आढळल्यास गजाआड व्हावे लागेल, असा निर्वाणीचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देव्हॅलेंटाइन डे : कॅफेंवर लक्ष; पिंपळगाव बसवंतला गस्त वाढविली

पिंपळगाव बसवंत : प्रेमाच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्यांसह शहरातील कायदा व सुव्यवसथा बाधित राखण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रेमीयुगुलांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणांवर किंवा कॅफेमध्ये अवैधरीत्या खोल्यांमध्ये आढळल्यास गजाआड व्हावे लागेल, असा निर्वाणीचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.बुधवारी (दि. १२) पोलिसांना शहरातील कॅफेत अश्लील चाळे केले जातात याची माहिती मिळाल्याने शहरातील कॅफेचालकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. तसेच असे कृत्य थांबविण्यासाठी शहरातील कॅफेंवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकही नियुक्त करण्यात आले आहे. मिनी दुबई व व्यापारी शहर व तालुक्यातील सर्वात मोठे महाविद्यालय असल्याने अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना व महाविद्यालय तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी विविध दुकाने थाटली आहेत. यामध्ये कॅफेचादेखील समावेश आहे व येथील कॅफे बदनामीच्या फेºयातदेखील आहेत. युवक-युवतींना एकांत मिळावा, यासाठी कॅफेमध्ये विशिष्ट सोय केली आहे. कॅफेत युवक व युवती एकत्र किती वेळ घालविणार, त्यावर तेथील बिल ठरते, याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी कॅफेचालकांना बोलावून नोटिसा बजावल्या व व्हॅलेंटाइन डेमुळे कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, यासाठी पोलीस करडी नजर ठेवून आहेत. प्रेमाच्या नावाखाली स्वैराचार सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यंदा प्रेमदिनी कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस अधिक सज्ज झाले आहेत.कॅफे बुक केलेल्यांचा हिरमोडव्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तरु ण-तरु णींना एकांत मिळावा म्हणून काही व्यावसायिकांनी परिसरात कॅफे व हॉटेलची सोय केली आहे. प्रेमीयुगुल किती वेळ येथे थांबणार यानुसार वेगवेगळे दर आकारून बुकिंग करण्यात आले होते, मात्र कॅफेचालकांना पोलिसांनी नोटिसा दिल्याने अनेकांनी बुकिंग रद्द केले तर पोलिसांच्या भीतीमुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे.कॅफेत किंवा हॉटेलमध्ये बसून तरु ण-तरु णी बोलत असतील तर त्यास आक्षेप असण्याचेही कारण नाही, मात्र तेथे कोणी अश्लील चाळे करताना दिसून आल्यास त्यांना गजाआड व्हावे लागेल. तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलीस व नागरिकांची जबाबदारी आहे.- कुणाल सपकाळे,सहायक पोलीस निरीक्षकव्हॅलेंटाइन डे असल्याने शहरात कडक कारवाई केली जाते. त्यामुळे अनेक तरु ण-तरु णींनी ग्रामीण भागाकडे धाव घेतली. या भागातील हॉटेल्समध्ये अश्लील चाळे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पोलिसांनी हॉटेल्सची तपासणी करावी.- नंदू पवार, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेPoliceपोलिस