शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

जुगाराचे डाव पोलिसांनी उधळले

By admin | Updated: January 20, 2017 01:00 IST

पंधरा हजार जप्त : चार जुगार अड्ड्यांवर धाडी

नाशिक : शहरात वाढलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा वक्रदृष्टी केली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी परिसरातील चार ठिकाणी रंगलेले जुगाराचे डाव उधळले. संशयित जुगाऱ्यांकडून सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.भद्रकालीतील तलवाडी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा मारला. यावेळी रियाज शेख, राधाकिसन खांबेकर, सचिन इंगोले, अजिज शेख, सलीम पठाण व विष्णू आदमाने यांनी जुगाराचा डाव रंगविल्याचे आढळून आले. पोलिसांनी जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नऊ हजार चारशे रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. दुसऱ्या कारवाईत बागवानपुऱ्यातील हरी मंजीलच्या बाजूला सुरू असलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळून उत्तम रनमाळे, शहिद शेख , पांडूरंग वाघ आदिंना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन हजार २२० रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्र्यंबकनाक्यावरील शाळेच्या खुल्या जागेत तसकर रंगरेज व रवि चव्हाण हे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ५१० रुपये जप्त केले आहे. नानावलीतील स्मशानभूमी परिसरात जुगार खेळणारे देवानंद चौधरी, अफरोज खान, सुनील सहाणेआदिंना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त केली आहे.एकूणच भद्रकाली भागात चार ठिकाणी सुरू असलेले जुगार अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. ज्याप्रमाणे जुगार अड्ड्यांवर भद्रकाली पोलिसांनी कारवाई केली त्याप्रमाणे हद्दीमधील अन्य अवैध धंद्यांचा उपद्रवही थांबवावा, अशी मागणी होत आहे. किरकोळ जुगार अड्ड्यांसह, अवैध मद्यविक्री, गांजाविक्री, मटका, बॉलगेम, रोलेटसारखे अवैध धंद्यांवरही धाड टाकून मोठे मासेही गळाला लावल्यास गुन्हेगारीला आळा बसेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)