शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीत मागासवर्गीयांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:18 IST

गृहखात्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी नव्याने तयार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्टÑ पोलीस अकादमीतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण झालेल्यांना डावलून दुस-या किं वा तिस-या प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्यांची सेवाज्येष्ठता अगोदर धरण्यात आली

ठळक मुद्देगृहखात्याचा कारभार : सेवाज्येष्ठता जाहीर होवूनही अन्याय मागासवर्गीयांना पदोन्नती न देण्यामागचे कारण मात्र स्पष्ट केलेले नाही.

नाशिक : सहाय्यक निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी डावलणा-या राज्याच्या गृहखात्याने गेल्या आठवड्यात राज्यातील २९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देताना मागासवर्गीय सहाय्यक निरीक्षकांना डावलले असून, त्यामुळे अगोदर सेवाज्येष्ठता डावलल्या गेलेल्या पोलीस अधिका-यांमध्ये आता पदोन्नतीतही डावलले गेल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये पदोन्नती दिली जात असल्याचे गृहखात्याने म्हटले असले तरी, त्यातून मागासवर्गीयांना पदोन्नती न देण्यामागचे कारण मात्र स्पष्ट केलेले नाही.पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीत सेवाज्येष्ठता डावलल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये यापुर्वीच प्रसिद्ध करण्यात आल्याने त्याची दखल घेत गृहखात्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी नव्याने तयार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्टÑ पोलीस अकादमीतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण झालेल्यांना डावलून दुस-या किं वा तिस-या प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्यांची सेवाज्येष्ठता अगोदर धरण्यात आली होती, परिणामी सेवाज्येष्ठतेमुळे पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षकपदी लवकर बढती देण्यात आली तर सेवाज्येष्ठता डावललेल्या अधिका-यांवर अन्याय करण्यात आला होता. ज्यांची सेवाज्येष्ठता कमी होती, अशांना कालबद्ध पदोन्नतीनुसार पुन्हा पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली. त्यावर सेवाज्येष्ठता असुनही डावलले गेलेल्या अधिका-यांनी तक्रार केल्यानंतर गृहखात्याने नवीन सेवाज्येष्ठता यादी तयार केली. दि. १७ फेब्रुवारी रोजी गृहखात्याने राज्यातील २९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती दिली आहे. ही पदोन्नती देताना फक्त खुल्या प्रवर्गाचाच विचार करण्यात आला असून, सेवाज्येष्ठ असलेल्या मागासवर्गीय सहाय्यक निरीक्षकांना त्यातून डावलण्यात आले आहे. त्यामुळे सातत्याने गृहखात्याकडून अन्याय होत असल्याची भावना या अधिका-यांमध्ये निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सेवाज्येष्ठतेत डावलल्या गेलेल्या अधिका-यांनी तक्रारी केल्यानंतर गृहखात्याने सेवाज्येष्ठता पडताळणी नंतर पदोन्नती देण्यात येईल असे आश्वासनही या मागासवर्गीय अधिका-यांना दिले होते, परंतु त्याचे पालन मात्र करण्यात आलेले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक