नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत आयुक्तालयामार्फत नियुक्त करण्यात आलेले पोलीस शिपाई भाऊसाहेब विश्राम चत्तर (४३) यांना संशयितांनी अरेरावी करत धक्काबुक्की केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चत्तर हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पॉइंट ड्यूटीवर असताना संशयित आनंद अशोक तसांबड (२८, रा. काठेगल्ली) हा युवक आपल्या दोघा मित्रांसह दुचाकीवरून जात होता. यावेळी चत्तर यांनी त्यास हटकले व कागदपत्रांची चौकशी केली. यावेळी संशयित तसांबड यांनी त्यांना अरेरावी करत धक्काबुक्की केली.
पोलीस शिपायास धक्काबुक्की
By admin | Updated: September 7, 2016 00:59 IST