शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पुत्रासह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:06 IST

कुटुंबाला नुकसान पोहोचविण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस पुत्रासह त्याच्या मित्राविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : कुटुंबाला नुकसान पोहोचविण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस पुत्रासह त्याच्या मित्राविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२०१५ मध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीची मैत्रिणीमुळे यश विजय गांगुर्डे (वय २५) रा. नाशिकरोड पोलीस लाइन याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर २०१६ मध्ये संशयित यश याने त्या मुलीला नाशिकरोड पोलीस लाइन येथे पडक्या घरात नेऊन तुझ्या भावास काही पण करेल अशी धमकी देत तिच्यावर वारंवार जबरदस्ती केली. तसेच अश्लील फोटो फेसबुकला टाकण्याची धमकी दिली. मुलीने यश सोबत जाण्यास नकार दिल्यावर तुझ्या घरी येऊन तमाशा करेन, सोसायटीच्या लोकांना सांगून बदनामी करेन अशी धमकी दिली. गेल्या १६ फेब्रुवारी रोजी यश याने पुन्हा त्या मुलीला पडक्या खोलीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर १८ फेब्रुवारीला यशचा मित्र गणेश भामरे (३०) याने त्या मुलीला सीबीएसला बोलावून रिक्षाने सिडकोत त्रिमूर्ती चौक येथे एका फ्लॅटमध्ये नेऊन भावाला मारण्याची धमकी देत जबरदस्ती केली. पीडित मुलगी गेल्या ५ मार्च रोजी घराजवळ रात्री ८ वाजता शतपावली करत असताना यश याने पुन्हा पोलीस लाइनमधील पडक्या घरात नेऊन बांधून ठेवून जबरदस्ती करून दुसऱ्या दिवशी सकाळी सीबीएस येथे सोडून घरच्यांना सांग पुण्याला गेली होती असे सांगून निघून गेला.पीडित मुलगी सीबीएसजवळ एकटी उभी असताना पोलिसांनी तिची विचारपूस करून वडिलांशी फोनवरून बोलणे करून दिले. मुलगी घरी न आल्याने वडिलांनी उपनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली होती. पोलिसांनी पीडित मुलीला निर्भया व्हॅनमधून उपनगर पोलीस ठाण्यात पाठविले. त्यानंतर वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस