शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा ‘डिकॉय’ : महिलांची मध्यरात्री छेड काढणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 18:18 IST

देशभरात महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलावर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ लागले. महिलांमधील भय कमी करण्यासाठी आणि रात्रीदेखील महिलांच्या मदतीला पोलीस सज्ज...

ठळक मुद्देमहिलांना एकटे बघून रात्री अश्लील हावभाव पोलिसांनी त्यांचे चित्रीकरण पोलिसांनी ‘डिकॉय’ आखला.

नाशिक :  महिलांना रात्रीच्या वेळी एकटे बघून छेड काढण्याचा व अंगलट करण्याचा प्रयत्न करणा-या विकृत व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी खास ‘डिकॉय’ राबविण्याचे आदेश देत शहरात तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सापळा लावला. यावेळी साध्या वेशातील महिलांना सर्वसामान्य समजून एकटे बघून रात्रीच्या अंधारात अश्लील हावभाव करत छेडणा-याना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांचे अश्लील वर्तन कॅमे-याद्वारे 'स्टिंग' करून पुरावा म्हणून पोलिसांनी टिपले आहे.वेळ सोमवारी रात्री १२ वाजेची. ठिकाण : ठक्कर बाजार बसस्थानक. बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या एकट्या महिलेकडे एकटक बघत त्यानंतर महिला उठून बाहेर रस्त्यावर आली असता तिचा पाठलाग करून संशयित इसमाने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तसेच दुस-या घटनेत रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पंचवटी कारंजा, रामकुंड परिसरात अशाचप्रकारे दोघा महिलांना एकटे बघून अश्लील हावभाव करत छेड काढण्याचा प्रयत्न दोघांकडून झाला. रात्री महिलांची छेड काढणाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. ठक्कर बाजार बसस्थानकात संशयित कमलकुमार गिरधारीलाल खेमानी (५२, रा.चेतनानगर ) याने साध्या वेशातील महिला पोलिसांकडे एकटक बघून त्यांच्या स्त्रीमनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन तर केलेच; मात्र अशोकस्तंभापर्यंत त्याच्या खासगी वाहनाने पाठलाग केल्याचे पोलिसांनी सांगितले. खेमानी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.प्रसंग २ : पंचवटी पोलीस ठाणे : येथील पंचवटी कारंजा, रामकुंड परिसरात साध्या वेशात महिला पोलीस रस्त्यांवर एकट्या फिरत होत्या. कारंजाजवळ महिला रिक्षाची वाट पाहत उभी आहे, असे भासविण्यात आले. यावेळी तेथे संशयित आशिष लक्ष्मीचंद अग्रहरी (३०, रा. पंचवटी) याने येऊन महिलेकडे एकटक बघत डोळ्यांनी इशारे करून अश्लील वर्तन केले. पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेऊन विनयभंगाच्या उद्देशाने अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच रामकुंड येथे महिला पोलीस साध्या वेशात पायी फिरत असताना अक्षी अमिर इस्माईल अत्रम (४५, रा. पंचवटी) याने महिलेचा पाठलाग करून तिच्याशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न करत हावभाव केल्याने पोलिसांनी अत्रम यास ताब्यात घेतले.प्रसंग ३ : अंबड पोलीस ठाणे : येथील एका सिनेमागृहाजवळ पोलिसांनी ‘डिकॉय’ आखला. यावेळी साध्या वेशात उभ्या असलेल्या महिला पोलिसाकडे बघून संशयित हेमंत शिवाजी वाघ (३३, रा. पारिजातनगर), भरत अभिमान पाटील (३३, रा. एकदंतनगर), गणेश परशुराम वरूडे (३१, रा. दत्तमंदिर) या तिघांनी अश्लील हातभाव केले. तसेच ‘चल, लॉजला जाऊ’ असे बोलून स्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांचे चित्रीकरण केले असून, कलम ५०९ प्रमाणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकWomenमहिलाMolestationविनयभंग