शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाघ खून प्रकरणी दोघांना चार दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:53 IST

सहा दिवसांपूर्वी मोकळ्या जागेत झालेल्या अट्टल घरफोड्या प्रशांत वाघ याच्या खूनप्रकरणी मयत प्रशांतचाच दाजी व त्याचा मित्र अशा दोघा संशयितांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नाशिकरोड : सहा दिवसांपूर्वी मोकळ्या जागेत झालेल्या अट्टल घरफोड्या प्रशांत वाघ याच्या खूनप्रकरणी मयत प्रशांतचाच दाजी व त्याचा मित्र अशा दोघा संशयितांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.जयभवानीरोड श्री तुळजाभवानी मंदिराशेजारी मोकळ्या जागेत गेल्या शनिवारी सकाळी अट्टल घरफोड्या करणारा प्रशांत शांतीलाल वाघ याचा धारदार शस्त्राने वार करून डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून उपनगर पोलीस व क्र ाईम ब्रँचचे सर्व युनिट या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात सर्वतोपरी प्रयत्न करत होते. वरिष्ठ पोलीस दिनेश बरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, श्यामराव भोसले, युवराज पाटील, श्रीराम सपकाळ, संजय ताजणे, देवकिसन गायकर, अन्सार सय्यद, जयेश शिंदे यांनी मयत प्रशांत याच्या सर्व सहकाऱ्यांची कसून चौकशी केली. यामध्ये प्रशांत हा नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करीत असल्याने ती नेहमी भांडण झाल्यानंतर गोरेवाडी येथे राहणाºया नणंदकडे जात असे. गेल्या गुरु वारी पुन्हा प्रशांत याचे पत्नीसोबत भांडण झाल्याने ती बाहेर निघून गेली होती. प्रशांतने गोरेवाडी येथे बहीण अश्विनीच्या घरी जाऊन माझी पत्नी कुठे आहे, अशी विचारणा करत शिवीगाळ करून दमदाटी केली. तुम्हीच माझ्या पत्नीला लपवले आहे, असे म्हणत तुमच्या मुलांना किडन्याप करून मारून टाकेल, असा दम दिला. मुलांच्या भीतीपोटी मयत प्रशांतचा दाजी दीपक जराप्पा पुजारी (रा. गोरेवाडी), रिक्षाचालक मनोज किसन शार्दुल (रा.फर्नांडीसवाडी) यांनी प्रशांत वाघ याचा धारदार शस्त्राने वार करून तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे.खून प्रकरणातील संशयित दीपक जराप्पा पुजारी व मनोज किसन शार्दुल यांनागुरु वारी दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता ९ मार्चपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी