पोलिसांची नाकाबंदी तरीही घडते सोनसाखळी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:14 AM2021-04-11T04:14:32+5:302021-04-11T04:14:32+5:30

----- नाशिक : सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून ...

Police blockade still happens gold chain theft | पोलिसांची नाकाबंदी तरीही घडते सोनसाखळी चोरी

पोलिसांची नाकाबंदी तरीही घडते सोनसाखळी चोरी

Next

-----

नाशिक : सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडवर एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली.

दोन दिवसांपूर्वी म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मखमालाबादरोडवर आणि काठेगल्लीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यानी हिसकावून नेली होती. तसेच तत्पूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या घटनांचा तपास पोलिसांकडून सुरू केला जात नाही तोच आता पुन्हा मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत पखालरोडवर श्री अय्यपा मंदिराजवळ अर्चना अतुल अन्नदाते (४५, रा.गुरू अय्यपन अपार्टमेंट, खोडेनगर) यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सुमारे २५ ग्रॅमची सोनसाखळीतील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने आलेला चोरटा फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली तेथून पुढे अशोका पोलीस चौकीकडे सिग्नलवर बॅरिकेड टाकून रस्ता आठ वाजताच बंद केला जातो तरीदेखील सोनसाखळी हिसकावून नेणारा चोरटा निसटून जाण्यास यशस्वी ठरला. अन्नदाते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे शहरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी बॅरिकेड टाकून रस्ते बंद केले जात आहे, तरी दुसरीकडे मात्र सोनसाखळी चोरीचे गुन्हे सर्रासपणे घडत असून, चोरटे नाकाबंदीतून निसटताच कसे? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

------इन्फो-----

जेथे बॅरिकेडिंग तेथूनच हिसकावली सोनसाखळी

मुंबईनाका पोलिसांकडून पखालरोड हा दोन्ही बाजूंनी सिग्नलवर बॅरिकेड टाकून रात्रीच्या वेळी बंद केला जातो तसेच वडाळारोड, साईनाथनगरचा प्रमुख रस्ताही रात्री ८ वाजताच शिवाजीवाडी येथून बॅरिकेड टाकून अडविला जातो तरीदेखील या नाकाबंदीत सोनसाखळी चोर सापडत नाही आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरटे पसार होतात हे विशेष, अन पोलीस मात्र नाकाबंदी करताना सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून त्यांची उलटतपासणी करण्यातच रस दाखवीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नागरिकांची अडवणूक अन् गुन्हेगारांना मोकळीक दिली जात आहे का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

Web Title: Police blockade still happens gold chain theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.