शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गिर्यारोहकाला पोलिसांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:57 IST

पांडवलेणीच्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेला इसम पाय घसरून पडल्याने डोंगरावरच अडकून पडला. त्यास जखमी अवस्थेत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल व वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे वाचविले आहे.

इंदिरानगर : पांडवलेणीच्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेला इसम पाय घसरून पडल्याने डोंगरावरच अडकून पडला. त्यास जखमी अवस्थेत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल व वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे वाचविले आहे.पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर्यटकांना मुभा आहे, मात्र लेणी ओलांडून राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून डोंगर सर करण्यास वन कायद्यानुसार गुन्हा आहे. तरीही हौशी गिर्यारोहकांकडून डोंगर सर करण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी प्रवेश करण्याचे प्रयत्न केले जात असून, त्यामुळे वारंवार दुर्घटना घडण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पांडवलेणी येथील निसर्गरम्य ठिकाणी शुक्रवार (दि. २३) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास सिडकोतील उत्तमनगर येथे राहणारे बाळासाहेब सुरसे (५२) यांनी पांडवलेणीचा डोंगर सर केला, परंतु उतरण्याच्या वेळी पाय घसरल्याने ते सुमारे पंचवीस ते तीस फूट घसरत खाली पडले. त्याठिकाणी कोणीच नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. परंतु दहा वाजण्याच्या सुमारास एक पर्यटक त्याबाजूने जात असताना त्याला सुरसे हे जखमी अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली.इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राजेंद्र राजपूत, राजेश निकम व वैनेतय गिर्यारोहक संस्थेचे चेतन खर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंगरावर जाऊन जखमी बाळासाहेब सुरसे यांना डोंगरावरून खाली आणले. सुरसे यांच्या हाता-पायास मुक्का मार लागला असून, अनेक ठिकाणी ओरखडले आहे. तसेच त्यांचा डावा पाय फॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Trekkingट्रेकिंगPoliceपोलिसNashikनाशिक