शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकांना मारहाण करुन लूटणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 18:03 IST

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून जबरीने लूटमार करणाऱ्या दोन आरोपिंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासात अटक केली.

ठळक मुद्देआरोपींकडून महामार्गावरील रॉबरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना मारहाण करून जबरीने लूटमार करणाऱ्या दोन आरोपिंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासात अटक केली.मुंबई आग्रा महामार्गावर मंगळवारी (दि.२५) तळेगाव शिवारात मध्य प्रदेशातील कंटेनर चालक फिरोज रसूल खान याने कंटेनर रस्त्यालगत लावून काच पुसत असतांना दुचाकीवर आलेल्या ३ अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम व ३ मोबाईल जबरीने चोरून नेले. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळविलेल्या माहितीच्या आधारे तळेगाव ता. इगतपुरी व कसारा ता. शहापूर येथून २आरोपिंना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला आहे.या लूट प्रकरणी किशोर संजय मनोहर (२१), दिपक सखाराम जाधव (२१, रा तळेगाव, ता. इगतपुरी) या दोघांना अटक केली आहे. महामार्गावरील सतत होणाºया चोºया व लूट प्रकरणात यातील आरोपी दिपक जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्यांचेविरु द्ध कसारा पोलिस स्टेशनला जबरी चोरी तसेच रेल्वे इगतपुरी पोलीस ठाणेस दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपींकडून महामार्गावरील रॉबरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक शिर्मष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलिस निरिक्षक अनिल वाघ, सहायक पोलिस उपनिरिक्षक नवनाथ गुरु ळे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, संदीप हांडगे, सचिन पिंगळ, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबीले, गणेश वराडे, विनोद गोसावी यांच्या पथकाने घटनेचा गुन्हा नोंद होताच १२ तासात आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी