शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी पोळ्याच्या आदल्या रात्रीच ‘सर्जा’ चोरीला

By suyog.joshi | Updated: August 26, 2022 20:10 IST

यासंदर्भात बोलताना, ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यामुळे चोरीला आळा बसू शकेल, असे शालेय समितीचे अध्यक्ष भगवान मोरे यांनी म्हटले आहे.

नांदगाव (नाशिक) - ऐन पोळ्याच्या आदल्या रात्री पाच वर्षांचा बैल चोरी गेल्याने मूळडोंगरीचे शेतकरी तुकाराम गोविंद मोरे व्यथित झाले असून, त्यांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

पोळ्याच्या आदल्या दिवशी माळ्यावर ठेवलेले साजशृंगार गळ्यातली घुंगरू माळ, गोंडे, माथुटी काढले आणि सकाळी बैल गेला. हे समजल्यावर तुकाराम यांचे वडील गोविंदबाबाना टेन्शन येऊन त्यांना डॉक्टरकडे न्यावे लागले. तुकाराम मोरे हे हाडाचे शेतकरी असून घरच्या गाईपासून झालेला गोऱ्हा त्यांनी जीव लावून वाढवला होता. त्याला जोडी नव्हती म्हणून तीन वर्षांपूर्वी सर्जा बैल विकत घेतला. गेली अडीच वर्षे दोघा बैलांच्या जीवावर शेती फुलली, याची आठवण येऊन त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.

पोळ्याला सर्जा पैठण्याची जोडी गेली तीन वर्षे घरच्या महिलांनी बनविलेली पुरणपोळी गोडधोड खात होती. अतिशय प्रेमाने त्यांच्यासाठी स्वयंपाक केला जात होता. याची आठवण येऊन घरातील महिलांच्या डोळ्यांतसुद्धा अश्रू तरळत होते. 

चोरट्यांचा डाव दोन्ही बैलांना घेऊन पळण्याचा असावा. पण कुत्रे भुंकले म्हणून ते पळून गेले असावे, असा तुकाराम यांचा कयास आहे. कुत्रे भुंकण्याचा आवाज रात्री दोनच्या सुमारास आला होता. पण रात्री अधूनमधून कुत्रा भुंकतो म्हणून दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.

पोलिसात तक्रार दिल्यावर तुकाराम यांनी साकोरे पेट्रोल पंप, अन्नपूर्णा दुकान येथील सीसीटीव्हीने घेतलेली छायाचित्रे बघितली. त्यात त्यांना रात्री २ वा.च्या सुमारास उभे असलेले छोटा हत्ती हे वाहन दिसले. काल (शुक्रवार) सायंकाळी एकट्या सर्जाला ओवाळताना घरातील महिला अत्यंत भावनिक झाल्या होत्या. एक वर्षांपूर्वी समाधान सर्जेराव मोरे व शेतकरी बाळू चव्हाण या शेतकऱ्यांचे बैल चोरीला गेले होते.यासंदर्भात बोलताना, ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यामुळे चोरीला आळा बसू शकेल, असे शालेय समितीचे अध्यक्ष भगवान मोरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी