शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

वसुली पथकासमोर शेतकऱ्यांचे विषप्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:04 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्ज वसुली पथकासमोरच कर्जदार महिला शेतकºयाच्या मुलाने विषप्राशन केले. तर अन्य एका मुलाने जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकाच्या वाहनाची काच फोडल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, कर्जदार महिला व तीच्या मुलास नाशिकरोड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्ज वसुली पथकासमोरच कर्जदार महिला शेतकºयाच्या मुलाने विषप्राशन केले. तर अन्य एका मुलाने जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकाच्या वाहनाची काच फोडल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, कर्जदार महिला व तीच्या मुलास नाशिकरोड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हा बॅँकेचे कर्ज वसुली पथक पांढुर्ली येथे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वाजे मळ्यात गेले होते. यावेळी कर्जदार कुटुंबिय व वसुली पथक यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्यानंतर कैलास मुकुंद वाजे (३२) याने वसुली पथकासमोरच विष प्राशन केल्याचे समजते. यावेळी त्याची आई सुलोचना मुकुंद वाजे यांच्याही अंगावर व तोंडात विष गेल्याचे कळते. या दोघांनाही त्यामुळे विषबाधा झाली. दोघांना नाशिकरोड येथील संतकृपा रुग्णालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.  पांढुर्ली येथील सुलोचना मुकुंद वाजे यांनी विकास संस्थेकडून २००६ साली कर्ज घेतले आहे. या कर्ज वसुलीसाठी जिल्हा बॅँकेचे कर्ज वसुली पथक इनोव्हा कार (क्र. एम. एच. १७ व्ही. ९६९५) घेवून गेले होते. यावेळी उभयतांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याचे समजते. कैलास वाजे यांनी पथकासमोारच विष घेतले व आई सुलोचना यांच्याही तोंडात विष गेल्याचे कळते. यावेळी कैलास यांच्या लहान भावाने वसुली पथकाच्या वाहनावर दगड फेकल्याने काच फुटली. याप्रकरणी जिल्हा वसुली पथकातील अधिकाºयाने वाहनाचे नुकसान झाल्याची फिर्याद सिन्नर पोलीस ठाण्यात दिली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याbankबँक