शहर व परिसरात सोनसाखळी चोरांनी सर्वत्र थैमान घातले आहे. तपोवन रोडवरील निर्मल कॉलनीतील रस्त्यावरून फिर्यादी महिला विजया सुनील जगताप (४६, रा. सोनजेमळा, काठेगल्ली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जगताप या बुधवारी (दि. १०) सायंकाळच्या सुमारास शिकवणीसाठी गेलेल्या आपल्या नातवास घेण्यासाठी त्रिकोणी गार्डन भागात गेल्या होत्या. नातवाला सोबत घेऊन त्या भाजीबाजारातून पुढे टाकळी रोडच्या दिशेने पायी जात होत्या. यावेळी त्यांच्या समोरून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपनगर, नाशिकरोड, म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील पंधरवड्यापासून सातत्याने सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महिलेची सोनसाखळी हिसकावून पोबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST