शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मंगलमय वातावरण : चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सकाळची वेळ उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:09 IST

दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण अशा मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षीदेखील गणेशोत्सवाचा मोठा उत्साह शहरात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देगणपतीला लाल रंग प्रिय जास्वंदची फुले, शमीची पाने, दुर्वाचा प्रतिष्ठापना करताना पूजेत समावेश करावागणरायाची मुर्ती लाल वस्त्रामध्ये झाकून घरी आणावी

नाशिक : चतुर्थीच्या मुहूर्तावर गुरूवारी (दि.१३) गणरायाचे मंगलमय वातावरणात वाजत गाजत शहरात घरोघरी आगमन होणार आहे. नाशिककर गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी गणेश भक्तांकडून करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या पुर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत गणरायाच्या प्रतिष्ठापनेची लगबग पहावयास मिळाली. बहुतांश भाविकांनी आपल्या पसंतीची गणेशमुर्तीची आगाऊ नोंदणी केल्याचे दिसून आले. सकाळपासून तर दुपारपर्यंत ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्याचे पंचांगकर्त्यांनी सांगितले.विघ्नहर्ता गणरायाचे अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व आहे. गणरायाच्या पूजनाने प्रत्येक पूजाविधीला प्रारंभ केला जातो. संपुर्ण गणांचा नायक असलेल्या गणनायकाने अनेक आसुरी शक्तींचाही नाश केल्याचे शास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे हिंदू धर्मात गणरायाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण अशा मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षीदेखील गणेशोत्सवाचा मोठा उत्साह शहरात पहावयास मिळत आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी सुर्याेदयापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत मुहूर्त आहे. प्रतिष्ठापनेसाठी भद्रा योगाचा दोष मानू नये. सकाळी स्नान आटोपल्यानंतर गणरायाची मुर्ती लाल वस्त्रामध्ये झाकून घरी आणावी आणि विधीवत पध्दतीने पूजन करुन प्रतिष्ठापना करावी, असे गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.

डोंगरे वसतीगृह मैदान, ठक्कर डोम परिसरात गणेशमुर्ती खरेदीसाठी नागरिकांची सकाळी व संध्याकाळी गर्दी झाली होती. तसेच मेनरोड, भद्रकाली, रविवार कारंजा परिसरातही सजावट व पूजाविधीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडल्याने गर्दी वाढली होती. यावर्षी डोंगरे वसतीगृहावर मैदानावर गणेशमुर्ती विक्रीच्या दुकानांमध्ये वाढ झाली आहे. या ठिकाणी मुर्तीविक्रेत्यांसह सजावट साहित्य, पूजासाहित्यविक्री करणाऱ्या विक्रेत्यांनीही दुकाने थाटली आहेत.

प्रतिष्ठापनेसाठी सकाळची वेळ उत्तम‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेसाठी सुर्योदयापासून दुपारपर्यंत चतुर्थीचा मुहूर्त आहेच; मात्र सकाळी स्नान आटोपल्यानंतर बारा वाजेपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापनेची वेळ उत्तम आहे. भद्रा दोष मानू नये.चतुर्थी प्राधान्याने दिली असल्याने चतुर्थीला महत्त्व आहे. गणपतीला लाल रंग प्रिय असून जास्वंदची फुले, शमीची पाने, दुर्वाचा प्रतिष्ठापना करताना पूजेत समावेश करावा. संध्याकाळच्या पूजेत धूप, दिपसह नैवेद्य दाखवून आरती करावी. यानंतर मंत्र पुष्पांजलीचे पठण करुन गणरायाकडे मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करावी, असे पुरोहित सतीश शुक्ल यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८NashikनाशिकHinduismहिंदुइझम