शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

परिस्थितीशी दोन हात करत पूजाचा पाण्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 17:18 IST

 पिंपळगाव बसवंत : नौकानयन या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावणारा जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळ याचीच प्रेरणा घेत निफाड तालुक्यातील नारायणटेंभी येथील शेतकरी कन्या पूजा हिरामण गवळी हिनेही नौकानयनमध्ये प्रावीण्य कमावण्याची जिद्द उराशी बाळगली आहे. शेतीकाम करून नौकानयनमध्ये नावलौकिक कमावण्यासाठी पूजाची सुरू असलेली धडपड पंचक्रोशीत कौतुकाचा व चर्चेचा विषय बनली आहे.

ठळक मुद्देनारायणटेंभीतील शेतकरी कन्या : नौकानयन क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळविण्याची जिद्द

राजेंद्र पवार

 पिंपळगाव बसवंत : नौकानयन या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावणारा जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळ याचीच प्रेरणा घेत निफाड तालुक्यातील नारायणटेंभी येथील शेतकरी कन्या पूजा हिरामण गवळी हिनेही नौकानयनमध्ये प्रावीण्य कमावण्याची जिद्द उराशी बाळगली आहे. शेतीकाम करून नौकानयनमध्ये नावलौकिक कमावण्यासाठी पूजाची सुरू असलेली धडपड पंचक्रोशीत कौतुकाचा व चर्चेचा विषय बनली आहे.प्रतिकूल स्थिती असतानाही केवळ शिकण्याची जिद्द असलेली पूजा गवळी ही परिस्थितीशी दोन हात करत नौकानयनमध्येही हात-पाय मारताना दिसत आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावाशेजारी नारायणटेंभी हे एक लहानसे खेडेगाव. या गावात राहणारी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी पूजा हिरामण गवळी. याच गावात प्राथमिक शिक्षण घेऊन तिने पुढील शिक्षण पिंपळगाव बसवंत येथे केले.

सध्या एम.कॉम.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली पूजा उत्तम प्रकारे नौकानयन करते. यासाठी तिला पिंपळगावचे क.का. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. लहानपणीच मातृछत्र हरपलेल्या पूजाचा सांभाळ तिच्या मोठ्या आत्याने केला. नौकानयन जसे आनंद देणारे आहे तसे ते धोकादायकही आहे. त्यामुळे पूजाला नौकानयनसाठी अगोदर घरातून विरोध झाला होता. पण तिच्यातील शिकण्याची जिद्द व आवड पाहून वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. पूजा महाविद्यालयाकडून भोपाळ व दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी झाली असून आता ती राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करत आहे.इन्फोशेतीकाम अन‌् शिक्षणहीपूजा सकाळी साडेसहा वाजता नारायणटेंभीवरून पिंपळगावला कादवानदीच्या तिरावर महाविद्यालयाने केलेल्या बोटिंग पॉइंटवर दररोज सरावासाठी येते. तिथे इतरही ज्येष्ठ मुले व मुली आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेते व नियमित सराव करते. त्यानंतर महाविद्यालयात जाऊन आल्यानंतर घरी तिच्या वडिलांना शेतीकामात मदत करते. वडिलांना ट्रॅक्टर चालवता येत नसल्याने ती स्वतः ट्रॅक्टरने द्राक्षबागेला औषध फवारणी करते, शेताला पाणी भरते. आरोग्याचे महत्त्व जाणणारी पूजा परत पिंपळगावला जिमला जाते. नवीन काहीतरी शिकण्याची तिची धडपड व कष्ट करण्याची तिची तयारी पाहून तिला प्रोत्साहनही मिळत आहे. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासWaterपाणी