शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

अभिनय क्षेत्रात यशासाठी नाटकाचा पाया महत्त्वाचा : मृणाल दुसानीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:57 IST

सिनेमा असो अथवा व्यावसायिक नाटक. अभिनय क्षेत्रात यशप्राप्तीसाठी कलाकाराचा पाया पक्का असणे गरजेचे आहे. विविध नाट्य स्पर्धा आणि प्रायोगिक नाटकांतून कलाकाराला त्याच्या कलेचा पाया भक्कम करण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन ेअभिनेत्री मृणाल दुसानीस यांनी केले.

महानिर्मिती राज्य नाट्य स्पर्धानाशिक : सिनेमा असो अथवा व्यावसायिक नाटक. अभिनय क्षेत्रात यशप्राप्तीसाठी कलाकाराचा पाया पक्का असणे गरजेचे आहे. विविध नाट्य स्पर्धा आणि प्रायोगिक नाटकांतून कलाकाराला त्याच्या कलेचा पाया भक्कम करण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल दुसानीस यांनी केले.  नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातर्फे कालिदास कलामंदिर येथे महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेचे दुसानीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्यासह व्यासपीठावर सौरऊर्जा मुख्य अभियंता नवनाथ शिंदे, सुनील इंगळे, देवेंद्र मशाळकर, राकेश कमटमकर, शशांक चव्हाण, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते. विद्युत केंद्र एकलहरेच्या रश्मी काळोखे लिखित ‘चौकशी’ नाटकाने स्पर्धेस प्रारंभ झाला. नाटकाच्या केंद्रस्थानी आयुष्यात वारंवार होणाऱ्या विविध चौकशांचा सामना करणाºया ‘पारी’चे पात्र आहे. चौकशीच्या माध्यमातून शासकीय कार्यप्रणालीतील त्रुटी, त्यावरील समाज शक्तीचा प्रभाव, काही लोकांच्या हितासाठी घडवून आणल्या जाणाºया तसेच दप्तरजमा केल्या जाणाºया चौकशीच्या घटना, महिलेचा कौटुंबिक छळ, मन हेलावून टाकणाºया घटना अशा विविध वास्तवावर या नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. सुनील सुळेकर, प्रवीण मोरे, नितीन शेटे, मनोज माळवे, ज्योती चंद्रमोरे, प्राजक्ता मल्हारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शन विजय रावळ, नेपथ्य गुलाब पवार, संगीत नागेश पद्मन, रंगभूषा व वेशभूषा ज्योती चंद्रात्रे यांनी केले आहे. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यात अनिल मुसळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जयश्री गोरे यांनी केले. आभार निवृत्ती कोंडावले यांनी मानले.आजचे नाटक-  नाटक : ४७ एके ४७,  वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी १.००,  नाटक : दि गेम आॅफ डेस्टिनी, वेळ : दुपारी ४.०० ते सायं : ७.००, 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकMrunal Dusanisमृणाल दुसानीस