शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

Plastic Ban : कारवाई थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:30 IST

व्यापाऱ्यांचा इशारा : प्रदत्त समितीशी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात लागू केलेल्या प्लास्टिकबंदीची २३ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी व्यापाºयांना दंड करण्याचा धडाका लावल्याने संतप्त झालेल्या व्यापाºयांनी राज्य सरकार तथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आणण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी वर्ग एकवटण्यास सुरुवात झाली असून, सरकारच्या निर्णयाविषयी भूमिका निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि.२५) व्यापाºयांची बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु, या बैठकीत महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम.जोशी यांनी व्यापाºयांच्या समस्या व अडचणींवर कोणतेही भाष्य न करता केवळ शासन निर्णय व अंमलबजावणीच्या तरतुदी सांगण्याचा रेटा लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाºयांनी प्लास्टिक विरोधी कारवाई बंद करण्याची जोरदार मागणी के ली. परंतु, या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अधिकाºयांनी हतबलता दाखवल्याने व्यापारी आक्रमक झाले. यावेळी माजी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा यांनी मध्यस्थी करीत व्यापाºयांची समजूत घातली. तसेच अधिकाºयांकडून मिळणाºया माहितीनंतर व्यापाºयांना नेमक्या काय समस्या येत आहेत ते मांडण्याचा पर्याय सुचवल्यानंतर व्यापाºयांनी संयमी भूमिका घेत आम्ही प्लास्टिकबंदीच्या विरोधात नसून कोणताही व्यापारी पर्यावरण विरोधी नाही. मात्र शासनाने प्रथम प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करावा, त्यानंतरच प्लास्टिकबंदी लागू करावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली. त्यावर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनीही व्यापाºयांशी संवाद साधताना २० जून रोजी मंत्रालयात बेकरी असोसिएशन व किरकोळ व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत प्लास्टिक बंदीविषयी सरकारने दिलेल्या आश्वासनावर अद्याप निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे प्लास्टिकबंदी तरतुदींमध्ये आणखी काही सुधारणा होणे शक्य असल्याचे सांगतानाच मंगळवारी (दि.२६) मंत्रालयात प्रदक्त समितीसोबत होणाºया बैठकीत व्यापाºयांच्या समस्या मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर व्यापाºयांनी सामंज्यस्याची भूमिका घेतली. परंतु, जोपर्यंत सरकार या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढीत नाही, तोपर्यंत महापालिकेने कारवाई कारवाई थांबवावी अन्यथा शहरातील व्यापारी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा व्यापाºयांनी दिला. यावेळी कापड व्यापारी संघटनेचे अद्यक्ष दिग्वीजय कापडिया, अनिल लोढा, खुशाल पोद्दार, सोनल दगडे, बकेश पटेल, प्रफुल्ल संचेती आदी व्यापारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी