कनाशी : महाराष्ट्र शासना व वनविभाग यांच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत कनाशी वनपरिक्षेत्रात एक लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड आमदार जे.पी गावीत नाशिक पुर्वचे उपवनसंरक्षक तृषार चव्हाण,सहाय्यक उपवनसरंक्षक सुचित नेवसे आदी मान्यवरच्या हस्ते शेपूपाडा येथे वृक्ष लागवड करण्यात आलीमहाराष्ट्र शासन वनविभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमअंतर्गत कनाशी वनपरिक्षेत्रातील दळवट, हतगड, कनाशी, जयदर आदी वनपरिमंडळात वनखात्याच्या १५२ हेक्टर जागेत एक लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये शिवण, आपटा, खैर, शिसव, कंरज, आवळा, कांचन, सांग, बांबू, गुलमोहर, या वृक्षांचा समावेश आहे.वनविभागाने गावागावात जाऊन जनजागृती करण्याचे काम वनविभागाने केल्याने ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठया प्रमाणात उत्साह दिसून आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घरटे, वनपाल डी. एम. बडे, वनरक्षक चौरे, महाले, बिहरेम, कोडे आदीसह वनकमेटीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
कनाशी वनपरिक्षेत्रात १ लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:42 IST
कनाशी : महाराष्ट्र शासना व वनविभाग यांच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत कनाशी वनपरिक्षेत्रात एक लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड आमदार जे.पी गावीत नाशिक पुर्वचे उपवनसंरक्षक तृषार चव्हाण,सहाय्यक उपवनसरंक्षक सुचित नेवसे आदी मान्यवरच्या हस्ते शेपूपाडा येथे वृक्ष लागवड करण्यात आली
कनाशी वनपरिक्षेत्रात १ लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड
ठळक मुद्देवनपरिमंडळात वनखात्याच्या १५२ हेक्टर जागेत एक लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड