शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगी यात्रोत्सवासाठी  २५८ बसेसचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:15 IST

नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे.

नाशिक : नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यानुसार विभागातील आगारांमधून २५८ बसेसचे नियोजन करण्यात आले असून, पहिले तीन दिवस फक्त कळवण आगाराच्या बसेसची गडावर वाहतूक करता येणार आहे.दि. २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत देवीचा नवरात्रोत्सव असल्याने जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने गडावर दर्शनासाठी जातात. या कालावधीत नांदुरी गावापर्यंतच खासगी वाहनांना परवानगी असून गडावर जाण्यासाठी केवळ महामंडळाच्या बसेसला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अन्य खासगी वाहने केवळ नांदुरी पायथ्यापर्यंत वाहतूक करू शकणार आहे. नवरात्रोत्सवातील पहिले तीन दिवस कळवण आगाराच्या बसेस नांदुरी पायथा ते सप्तशृंगी गड अशी प्रवासी वाहतूक सुरू ठेवणार आहे. त्यानुसार बसेसची संख्यादेखील वाढविली जाणार आहे. त्यानंतर दि. २ आॅक्टोबरपासून विभागातील इतर आगाराकडून वणी गडासाठी बसेस सोडल्या जाणार आहेत.शहरातील सीबीएस येथून सर्वाधिक १०६ बसेसच्या माध्यमातून सप्तशृंगी गडासाठी बसेस धावणार आहेत. नाशिक-१ आगारातून ३१, नाशिक-२ आगारातून १५, सटाणा- ०५, सिन्नर-१०, नांदगाव-०३, इगतपुरी-०५, लासलागाव-१०, कळवण-१०, येवला-०५, पेठ-०५ आणि पिंपळगाव आगारातून ०८ गाड्या सीबीएस आगारातून प्रवासी वाहतुकीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. नांदुरी पायथा ते गड या मार्गावर दिवसा ६० तर रात्रीच्या सुमारास ३० बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. कळवण आगारातील सर्वाधिक ३० बसेसचा यामध्ये समावेश आहे. मालेगाव ते गड अशा १५ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहे. मालेगाव ते गड २५, मनमाड ते गड १५, सटाण्याहून गडापर्यंत ५, दिंडोरीतूनही ५ तर पिंगळगावमधून वणीसाठी ७ गाड्या धावणार आहेत.जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वणी येथील यात्रोत्सवानिमित्ताने येथील कामकाजाचा आढावा घेतला. वणीमध्ये झालेला मुसळधार पाऊस, गडावर जाण्यासाठीची ट्रॉली, घाटाची परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या उपायायोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली तसेच काही सूचनादेखील केल्या आहेत. गडावर तसेच गडाच्या मार्गावरील गर्दीचे व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठीच्या काही सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.यावेळी पोलीस दलातील अधिकारी, ट्रस्टचे पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :state transportएसटीsaptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर