तळापर्यंत योजना पोहोचणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:58 PM2020-02-23T23:58:08+5:302020-02-24T00:46:44+5:30

प्रत्येक कल्याणकारी योजना ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गोंदेगाव येथे केले. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Plan to reach the bottom! | तळापर्यंत योजना पोहोचणार !

गोंदेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी प्रमाणपत्रांसोबत महिला. समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समिती सभापती अनुसयाबाई जगताप, उपसभापती शिवाजी सुरासे, सरपंच शांताराम कांगणे, उपसरपंच विक्र म भोसले, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर कांगणे आदी.

Next
ठळक मुद्देबाळासाहेब क्षीरसागर : कौशल्य विकास प्रशिक्षणाचा समारोप

लासलगाव : प्रत्येक कल्याणकारी योजना ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गोंदेगाव येथे केले. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमप्रसंगी निफाड पंचायत समितीच्या सभापती अनुसयाबाई जगताप, उपसभापती शिवाजी सुरासे, सरपंच शांताराम कांगणे, उपसरपंच विक्रम भोसले, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर कांगणे, रावबा साळवे, विठाबाई बर्डे, प्रवीण नाईक, अशोक वाघ, आनंद भोसले, सुवर्णा भोसले, रज्जाकभाई पठाण आदी उपस्थित होते. यावेळी उपसभापती शिवाजी सुरासे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोंदेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित ब्यूटिपार्लर प्रशिक्षणाचा ४० महिलांनी लाभ घेतला असून, त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी श्रीराम शैक्षणिक विकास केंद्र व नेहरू युवा व ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने प्रशिक्षक म्हणून पूजा वाकचौरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले, तर आभार आकांक्षा साळवे यांनी मानले.

Web Title: Plan to reach the bottom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.