शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

सीआयडी प्रशिक्षण  केंद्राच्या जागेचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:55 IST

राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट पोलीस अकादमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणारे विद्यालय नाशिकमध्ये होत असले तरी त्याच भूखंडावर महापालिकेने पाणीपुरवठ्याचे आरक्षण टाकले

नाशिक : राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट पोलीस अकादमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणारे विद्यालय नाशिकमध्ये होत असले तरी त्याच भूखंडावर महापालिकेने पाणीपुरवठ्याचे आरक्षण टाकले असून, त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. सदरच्या जागेवर पाणीपुरवठ्याचे आरक्षण ठेवून एकत्रितरीत्या महाविद्यालय बांधावे, असा संयुक्त प्रकल्पाचा तोडगा महापालिका आयुक्तांनी काढला आहे. तथापि, राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला ते अव्यवहार्य वाटल्यास प्रशिक्षण विद्यालय नाशिकमधून अन्यत्र स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यातील पोलीस अधिकाºयांना प्रशिक्षण देणारी महाराष्टÑ पोलीस अकादमी ही मोठी संस्था नाशिक शहरात असून, या संस्थेच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना प्रशिक्षित केले जाते. सध्या संस्थेला जागा अपुरी पडत असल्याने नव्याने सुरू होणाºया गुन्हे अन्वेषण महाविद्यालयाला तेथे जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राजवळ बॉईज टाउन रोडवर असलेल्या जागेवर हे प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर बांधण्याचे अकादमीने ठरवले असून, त्यासंदर्भात महाराष्टÑ राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबईने निविदा काढल्या आहेत. सदरचा भूखंड अकादमीच्या मालकीचा असून, त्यावर मुबलक बांधकाम होऊ शकत असले तरी त्यावर महापालिकेने पाणीपुरवठा विभागाचे आरक्षण टाकले असून त्यामुळेच हा आराखडा मंजुरीविना रखडला आहे. महापालिकेने अकादमीच्या खासगी जागेवर अचानक आरक्षण टाकल्याने अकादमीचे अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत. विशेष म्हणजे या भूखंडापासून रस्ता ओलांडला की तेथे महापालिकेचे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र असून, तेथे मुबलक जागा आहे. कोणी अधिकारी राहात नसल्याने त्यांच्या निवासस्थानात महापालिकेने चक्क पाणीपुरवठा विभागाचे पश्चिम विभागाचे कार्यालय थाटले आहे. तथापि, तेथील जागा सोडून महापालिकेनेदेखील अकादमीच्या जागेवरच पाणीपुरवठ्याची अतिरिक्त कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेने आरक्षण कायम ठेवून अकादमीला जागा वापरण्याची मुभा दिली आहे. तथापि, विद्यालय आणि अन्य बांधकामे येथे शक्य होतील काय याची पडताळणी अकादमी आणि गृहनिर्माण महामंडळ करीत आहे. त्यानंतर विद्यालयाच्या बांधकामाचा निर्णय घेतला जाणार आहे.महासभेकडे लक्ष : स्थलांतराची मात्र तयारीमहापालिकेच्या वतीने योग्य तो विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने सध्या महासभा काय धोरणात्मक निर्णय घेते याकडे अकादमीचे लक्ष लागून आहे. तथापि, मनपाची नकारात्मक भूमिका कायम राहिल्यास विद्यालय अन्यत्र स्थलांतरित करण्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका