नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील हातपंपाच्या सांडपाण्याची नादुरुस्त पाइपलाइन ग्रामपंचायतीने दुरुस्त केली आहे. त्यामुळे साचणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होणार असल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील सिन्नर-सायखेडा रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या हातपंपाच्या सांडपाण्याची नादुरुस्त झालेली पाइपलाइन ग्रामपंचायतीने दुरुस्ती केली आहे. यामुळे साचणाºया सांडपाण्याचा निचरा होणार असल्याने परिसरातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार आहे. मंगळवारी रात्रीच्या वेळी सरपंच नलिनी गिते, उपसरपंच सुरेश गिते, विलास गिते व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने येथील पाइपलाइन नव्याने टाकली. येथील हातपंपाचे सांडपाणी जाणारी पाइपलाइन अनेक दिवसांपासून फुटल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरत होती.
ग्रामपंचायतीकडून पाइपलाइन दुरु स्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:47 IST