शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीवरची शाळा पाहण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:10 IST

इगतपुरी : कोरोना काळात शृंखला तुटलेल्या शिक्षणासाठी राज्यभरात उपयुक्त ठरलेल्या टीव्हीवरच्या शाळेच्या धामडकीवाडी पॅटर्नची पाहणी इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी केली.

ठळक मुद्देधामडकीवाडी : भक्कम रस्ता करणार असल्याचा दिला शब्द

लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी : कोरोना काळात शृंखला तुटलेल्या शिक्षणासाठी राज्यभरात उपयुक्त ठरलेल्या टीव्हीवरच्या शाळेच्या धामडकीवाडी पॅटर्नची पाहणी इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी केली. खाचखळगे आणि िदगड गोट्यांच्या रस्त्याने एक किलोमीटर पायपीट करून गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी धामडकीवाडी गाठली. बिनरस्त्याच्या अतिदुर्गम धामडकीवाडीसाठी लवकरच भक्कम रस्ता करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल नेटवर्क नसतांनाही येथील शिक्षक प्रमोद परदेशी यांनी टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न यशस्वी केला. हा पथदर्शी प्रकल्प राज्यभरात अतिदुर्गम भागासाठी बहु उपयोगी असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाला सविस्तर कळवणार असल्याचेही ते म्हणाले.कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यभर शाळांमधील किलिबलाट थांबलेला आहे. यामुळे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विसर पडू लागल्याचा दुष्परिणाम व्हायला लागला. आॅनलाईन शिक्षण द्यावे तर मोबाईलला नेटवर्कनाही. पेचात सापडलेले इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न सूक्ष्म नियोजनाने यशस्वी केला. राज्याचा शिक्षण विभाग, शिक्षण संचालनालय, शिक्षण तज्ञ, टिलिमिली आदींनी दखल घेऊन टीव्हीवरच्या शाळेची प्रशंसा केली. याबाबत इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, केंद्रप्रमुख श्रीराम आहेर, शिक्षक संघटनेचे नेते निवृत्ती नाठे यांच्यासह धामडकीवाडीला भेट दिली. रस्ता नसलेली इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी येथे जाण्यासाठी अधिकाऱ्यांना एक किलोमीटर रस्ता तुडवावा लागला.धामडकीवाडी गावात पोहोचल्यावर चावडीवर लावलेल्या टीव्ही समोर बसून चिमुरडे विद्यार्थी आनंददायी शिक्षणाचे धडे गिरवत असतांना दिसले. घरांमध्येही टीव्हीवर धामडकीवाडी पॅटर्न सुरू असल्याचे अधिकाºयांनी विद्यार्थ्यांना अभ्यास क्र मावर आधारित प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. टीव्हीवर प्रसारण होणाºया यंत्रणेची माहिती गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी घेऊन प्रात्यिक्षक घेतले. टीव्हीवरच्या धामडकीवाडी पॅटर्नबाबत मुख्याध्यापक प्रमोद परदेशी, सहकारी शिक्षक दत्तू निसरड, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगीवले, शिक्षणप्रेमी स्वयंसेवक बबन आगीवले, केबल तज्ञ अमजद पटेल यांनी अधिकाºयांना उपक्र माचे प्रभावी सादरीकरण केले. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी