शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

नाशकात घरोघर थेट गॅसपुरवठ्यासाठी पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. या योजनेंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, येत्या आठवड्यात या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पालघरच्या प्रकल्पातून थेट पाइपलाइनद्वारे नाशिकला गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी गॅसचा साठा करण्यासाठी विल्होळीत स्टेशन उभारण्यात येणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम पालघर ते नाशिक पाइपलाइनचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी २५० किलोमीटरची पाइपलाइन टाकली जाणार आहे. या कामासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नाशिकमधील पाइपलाइनच्या कामकाजासाठी रोड डॅमेज चार्जेस म्हणून ८ कोटी रुपये कंपनीकडून महापालिकेला अदा करण्यात आले आहेत. तसेच महानगराच्या ज्या भागात खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, त्या परिसरात कंपनीने त्वरित काम सुरू करण्याचे निर्देशदेखील महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.

कंपनीने नुकतेच जेलरोड आणि शिंदे, पळसे तसेच पाथर्डी फाटा येथे सीएनजी पंपाच्या कामकाजाला प्रारंभ केला आहे. त्याशिवाय महानगरात अन्यत्र काही ठिकाणी सीएनजी पंप उभारण्याच्या कामालादेखील गती देण्यात येणार आहे.

इन्फो

मनपाच्या शहर बससाठी सुविधा

महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या शहर बससेवेसाठी महापालिकेच्या जागेत पाच सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मनपाच्या भविष्यातील शहर बससेवेसाठीदेखील हक्काच्या इंधनाची सोय होऊ शकणार आहे.