शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आयएमएतर्फे पिंक हेल्थ प्रोजेक्टला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 17:31 IST

या प्रोजेक्टअंतर्गत देशभरातील १० लाख मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार

ठळक मुद्देया प्रोजेक्टअंतर्गत देशभरातील १० लाख मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार

नाशिक - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे जिल्हयाभरातील विद्यार्थीनींसाठी ‘मिशन पिंक हेल्थ प्रोजेक्ट’ला प्रारंभ झाला असून पुढिल तीन महिने हा प्रोजेक्ट राबविला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली.या प्रोजेक्ट अन्वये इयत्ता ७वी ते १०वी या वयोगटातील शासकीय व बिगर शासकीय शाळेतील विद्यार्थींनींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १००० मुलींच्या आरोग्याची अत्याधुनिक हिमोग्लोबिन तपासणी मशिनद्वारे तपासणी करण्यात आली आहे. इतर तपासण्यांबरोबरच मुलींना ‘अ‍ॅनिमियामुक्त भारत’, ‘बेटी बचाव’,‘आओ गाव चले’ या नारा देत मार्गदर्शन केले जात आहे. या प्रोजेक्टसाठी नाशिक आयएमए अंतर्गत मिशन पिंक हेल्थ विंगने शहरातील स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, पॅथालॉजिस्ट, मानसोपचार तज्ञ यांचा सहभाग असलेले ग्रुप बनविले आहे. या प्रोजेक्टअंतर्गत देशभरातील १० लाख मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. संपुर्ण जिल्हाभरात ही मोहिम राबविली जाणार आहे. यात अ‍ॅनिमिया असणाऱ्या मुलींना रक्तवर्धक गोळ्या व पुरक आहार देण्यात येणार आहे. मुलींना आदर्श आहाराची माहिती दिली जाणार आहे. आहाराअभावी होणाºया परिणामांची कल्पना त्यांना देण्यात येणार आहे. ३ महिन्यानंतर या मोहिमेचे फलित आकडेवारीसह प्रसिद्ध केले जाणार आहे. याप्रसंगी आयएमएचे अद्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. राजश्री पाटील, डॉ. कविता गाडेकर आदि उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य