शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला पिंपळगाव खांब मलनि:सारण केंद्रासाठी पोलिस बंदोबस्तात सव्वा तीन एकर जागेचे संपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:02 IST

शेतकऱ्याचा विरोध : उर्वरित भूसंपादनाच्या प्रक्रियेला न्यायालयाकडून ‘जैसे थे’चा आदेश

ठळक मुद्देमलनि:सारण केंद्रासाठी सन २००७ मध्ये महापालिकेने जागा संपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव दिला होता. गट क्र. ६३ मधील शेतकऱ्यानी जागा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे

नाशिकरोड : पिंपळगाव खांब येथे महापालिकेने मलनि:सारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या संपादन प्रक्रियेला बाधित शेतकऱ्याचा असलेला विरोध डावलून त्यांना ताब्यात घेत पोलीस बंदोबस्तात सव्वातीन एकर जागेचे संपादन करण्यात आले. उर्वरित पावणेदहा एकर जागा संपादनास उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याने तेथील भुसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली.पिंपळगाव खांब येथे मलनि:सारण केंद्रासाठी सन २००७ मध्ये महापालिकेने जागा संपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव दिला होता. पिंपळगाव खांब येथील गट क्र. २ मध्ये सव्वातीन एकर (१.३ हेक्टर) व गट क्र. ६३ मध्ये पावणे दहा एकर (३.९ हेक्टर) अशा एकुण साडेबारा एकरवर मलनि:सारण केंद्राचे मनपाने आरक्षण टाकले होते. सदर प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी बाधित होणार होत्या त्यांनी त्यास कडाडून विरोध केला होता.  भुसंपादन विभागासह महापालिकेचे अधिकारी बुधवारी (दि.२२) पिंपळगाव खांब येथे मलनिसारण केंद्राची आरक्षित जागा संपादनासाठी गेले होते. यावेळी बाधित शेतकऱ्यानी जागा संपादनास कडाडून विरोध केल्याने वाद निर्माण झाला. गट क्र. ६३ मधील शेतकऱ्यानी जागा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेचा निकाल लागला नसून आम्ही कुठलाही मोबदला घेतलेला नाही असे सांगत विरोध दर्शविला. तरी देखील गट क्र. ६३ मध्ये कुंपण घालण्यासाठी खड्डे करून सिमेंटचे खांब रोवण्यात आले. मात्र शेतकऱ्यानी भुसंपादनाच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याचे सांगुन काही वेळाने आॅर्डर देऊ असे सांगितल्यानंतर तेथील भुसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली. गट क्रमांक दोन मधील शेतकऱ्यानी पैसे मिळाल्यानंतर भुसंपादनास संमतीपत्र लिहुन दिल्यानंतर काही अटी मान्य झाल्या नाहीत म्हणून जागा संपादीत करण्यास तीव्र विरोध केला. संबंधित शेतकऱ्यानी आमच्या काही अटी मान्य झाल्या नाहीत, योग्य मोबदला दिला नाही, मुलांना मनपामध्ये नोकरीत सामावून घ्यावे आदि मागण्यांवरून भुसंपादन प्रक्रियेला तीव्र विरोध केल्याने खुप वेळ वादविवाद सुरू होता. अखेर पोलिसांनी विरोध करणाऱ्याना ताब्यात घेऊन गट क्र. २ मधील भुसंपादनाची प्रक्रिया सायंकाळपर्यंत पार पाडली.

टॅग्स :FarmerशेतकरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका