शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव खांब मलनि:सारण केंद्रासाठी विरोध डावलून जागेचे संपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:34 IST

पिंपळगाव खांब येथे महापालिकेने मलनि:सारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या संपादन प्रक्रियेला बाधित शेतकºयांचा असलेला विरोध डावलून त्यांना ताब्यात घेत पोलीस बंदोबस्तात सव्वातीन एकर जागेचे संपादन करण्यात आले. उर्वरित पावणेदहा एकर जागा संपादनास उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याने तेथील भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात सव्वातीन एकर जागेचे संपादन साडेबारा एकरवर मलनि:सारण केंद्राचे आरक्षणमोजणी करतानादेखील तीव्र विरोध

नाशिकरोड : पिंपळगाव खांब येथे महापालिकेने मलनि:सारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या संपादन प्रक्रियेला बाधित शेतकºयांचा असलेला विरोध डावलून त्यांना ताब्यात घेत पोलीस बंदोबस्तात सव्वातीन एकर जागेचे संपादन करण्यात आले. उर्वरित पावणेदहा एकर जागा संपादनास उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याने तेथील भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली.पिंपळगाव खांब येथे मलनि:सारण केंद्रासाठी सन २००७ मध्ये महापालिकेने जागा संपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव दिला होता. पिंपळगाव खांब येथील गट क्र. २ मध्ये सव्वातीन एकर (१.३ हेक्टर) व गट क्र. ६३ मध्ये पावणेदहा एकर (३.९ हेक्टर) अशा एकूण साडेबारा एकरवर मलनि:सारण केंद्राचे मनपाने आरक्षण टाकले होते.  सदर प्रकल्पासाठी ज्या शेतकºयांच्या जमिनी बाधित होणार होत्या त्यांनी त्यास कडाडून विरोध केला होता. मनपाने टाकलेल्या आरक्षणाच्या विरोधात शेतकºयांनी उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केलेली आहे. या आरक्षित जागेची काही वर्षांपूर्वी मोजणी करतानादेखील तीव्र विरोध झाल्याने वाद निर्माण झाला होता. भूसंपादन विभाग-२ च्या उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार राजश्री अहिरराव, मंडळ अधिकारी बी. आर. कसबे, तलाठी एस. के. शिंदे, मनपा मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, मनपा अधीक्षक अभियंता संजय घुगे आदी अधिकारी, कर्मचारी कडेकोट पोलीस बंदोबस्तासह बुधवारी (दि. २२) सकाळी १०.३० च्या सुमारास पिंपळगाव खांब येथे मलनि:सारण केंद्राची आरक्षित जागा संपादनासाठी गेले होते. यावेळी बाधित शेतकºयांनी जागा संपादनास कडाडून विरोध केल्याने वाद निर्माण झाला. गट क्र. ६३ मधील प्रभाकर बोराडे, दीपक बोराडे, सुरेश बोराडे, भिवाजी बोराडे, दत्तू बोराडे, विश्वास बोराडे, हेमंत बोराडे आदी शेतकºयांनी जागा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेचा निकाल लागला नसून आम्ही कुठलाही मोबदला घेतलेला नाही, असे सांगत विरोध दर्शविला. तरीदेखील गट क्र. ६३ मध्ये कुंपण घालण्यासाठी खड्डे करून सीमेंटचे खांब रोवण्यात आले. मात्र शेतकºयांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्याचे सांगून काही वेळाने आॅर्डर देऊ असे सांगितल्यानंतर तेथील भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्यात आली. कुंपणासाठी खड्डे करताना शेतात गाड्या घुसविल्याने शेतमालाचे नुकसान झाल्याचा आरोप यावेळी शेतकºयांनी केला. शेतकºयांच्या  मागण्या अन् वाद गट क्रमांक २ मधील शेतकºयांनी पैसे मिळाल्यानंतर भूसंपादनास संमतीपत्र लिहून दिल्यानंतर काही अटी मान्य झाल्या नाहीत म्हणून जागा संपादित करण्यास तीव्र विरोध केला. महादू भिवा बोराडे, भिवा नामदेव बोराडे, प्रेमा गोपाळ बोराडे, लीलाबाई प्रेमा बोराडे, राजेंद्र शिवराम बोराडे यांच्या गट क्रमांक २ मधील सव्वातीन एकर (१३ हजार चौरस मीटर) जागेकरिता पाच कोटी ३७ लाख रुपये संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, त्यांनी संमतीपत्रदेखील लिहून दिल्याचे भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांनी सांगितले. मात्र संबंधित शेतकºयांनी आमच्या काही अटी मान्य झाल्या नाहीत, योग्य मोबदला दिला नाही, मुलांना मनपामध्ये नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांवरून भूसंपादन प्रक्रियेला तीव्र विरोध केल्याने खूप वेळ वादविवाद सुरू होता. अखेर पोलिसांनी विरोध करणाºयांना ताब्यात घेऊन गट क्र. २ मधील भूसंपादनाची प्रक्रिया सायंकाळपर्यंत पार पाडली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक आदींचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाlandslidesभूस्खलन