शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

तीर्थक्षेत्री भाविक ,पर्यटकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:39 IST

पर्यटनाला अत्यंत पोषक असा कालावधी म्हणजे हिवाळा. या ऋतूत निसर्गरम्य वातावरणात स्वच्छंद भटकंती करण्याचा मोह टाळता येणे अशक्यच. तीर्थक्षेत्र ते वाइन कॅपिटल अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकनगरीत भाविक पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे.

नाशिक : पर्यटनाला अत्यंत पोषक असा कालावधी म्हणजे हिवाळा. या ऋतूत निसर्गरम्य वातावरणात स्वच्छंद भटकंती करण्याचा मोह टाळता येणे अशक्यच. तीर्थक्षेत्र ते वाइन कॅपिटल अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकनगरीत भाविक पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. त्र्यंबकनगरीसह तपोवन, गंगापूर धरण परिसर पर्यटकांनी फुलला आहे.नाशिक म्हटलं तर डोळ्यापुढे कुंभमेळ्याचा उत्साह तरळतो तर येथील द्राक्षांची चव जिभेवर रेंगाळते. गोदातीरी दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा जसा जगप्रसिद्ध आहे तसेच द्राक्षसुद्धा. द्राक्षांपासून तयार होणाºया वाइनला तर भौगोलिक मानांकनही (जीआय टॅग) प्राप्त झाले आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारपेठेत नाशिकच्या वाइनची चव लोकप्रिय ठरली आहे. धार्मिक पुण्यनगरीचे पौराणिक, एतिहासिक महत्त्व लाभलेल्या नाशिकमध्ये भाविक पर्यटकांसह निसर्ग पर्यटकांचाही राबता वाढला आहे. तसेच येथील वायनरीजमध्येही विदेशी पर्यटकांच्या संख्येतही वाढ होऊ लागल्याचे निरीक्षण राज्य पर्यटन महामंडळाकडून नोंदविण्यात आले आहे. धार्मिक पर्यटनासाठी परराज्यातील भाविक पर्यटकांकडून नाशिकला आवर्जून पसंती दिली जाते. या वीकेण्डला त्र्यंबकेश्वरसह गोदाघाट, रामकुंड, तपोवन, पंचवटी, कावनई हे तीर्थक्षेत्र पर्यटकांनी गजबजून गेले होते.नाशिकला लाभलेले गोदावरीचे खोरे, सह्याद्रीची पर्वतरांग, गड-किल्ले, धरणे, घाटमार्ग, आदिवासी भागाचा बाज, वायनरी आणि धार्मिक-पौराणिक क्षेत्रामुळे पर्यटकांची नेहमीच नाशिकला पसंती असते. नाशिकपासून त्र्यंबकेश्वर, शिर्डी, इगतपुरी विपश्यना केंद्र जवळच असल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे. पुढील वीकेण्ड आणि ख्रिसमसची सुटी लागून असल्यामुळे पर्यटकांची संख्या अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. नाशिकमधील धार्मिक, नैसर्गिक पर्यटनासोबत गिरीभ्रमंती आणि धरण पर्यटनदेखील जमेची बाजू आहे.- नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटन विकास महामंडळ

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNashikनाशिक