शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप जीपची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 19:12 IST

मयत विजय धुमाळ याच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार असून दीड महिन्यांपूर्वी विजयचा विवाह झाला होता.

ठळक मुद्देअमृतधाम तारवाला लिंकरोडवरील घटना

पंचवटी : दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या ऍक्टिव्हा दुचाकीला अमृतधाम तारवाला लिंकरोडवर समोरून येणाऱ्या भरघाव पिकअप जीपने जबर धडक दिल्याने दोघा सख्ख्या भावंडांचा अपघात घडला. सदर अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पिकअप घटनास्थळापासून 100 फूट झाडाझुडुपांत अडकली होती. अपघातानंतर चालकाने गाडी सोडून पलायन केले.सदर अपघातात जुना गंगापूर नाका परिसरात राहणारा विजय शंकर धुमाळ (29) जागीच ठार झाला तर त्याचा लहान भाऊ संजय शंकर धुमाळ जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत अजय धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात पिकअप चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धुमाळ बंधू यांनी काही दिवसांपूर्वी आडगाव शिवारात खाद्य पदार्थ हातगाडी सुरू केली होती. काल रात्री दुकान बंद करून दोघे ऍक्टिव्हावरून (एम एच 15 इ झेड 9527) अमृतधाम तारवालानगर लिंकरोडने घराकडे जात असतांना तारवालानगरकडून अमृतधामकडे भरघाव वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीनेभास्कर प्लॅनेट इमारती समोर रस्त्यावर (एम एच15 एफ व्ही 1818) समोरून जबर धडक दिली त्यात दोघेजण गाडीवरून खाली पडले त्यात विजयच्या डोक्याला हाता पायाला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर संजय जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाचे तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला पोलिस वाहनातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते.मयत धुमाळ याच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार असून दीड महिन्यांपूर्वी विजयचा विवाह झाला होता.

टॅग्स :Accidentअपघातnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय