इगतपुरी : जुना कसारा घाट चढत असताना अचानक पिकअपने पेट घेतला, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.जुन्या कसारा घाटात मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना टोप बावडीजवळ पीकअप (एम एच १५ इएल ०६६१) या गाडीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक पेट घेतला. चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. सदर घटनेची माहिती मिळताच मुंबई-नाशिक एक्स्प्रेसवेची रूट पेट्रोलिंग टीम, अग्निशमन दल, घोटी महामार्ग पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम शहापूर यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र अर्धा तास महामार्गाची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी रुट पेट्रोलिंग ऑफिसर रवी देहाडे, दीपक मावरीया, संदीप म्हसने, फायर मॅन फिरोज पवार, प्रमोद भटाटे, नितीन रुपवटे, महामार्ग पोलीस घोटीचे सहायक उपनिरीक्षक हिरे, सहाणे, किरण आहेर, एच. पी. गुजरे, आपत्ती व्यवस्थापन टीमचे दत्ता वातडे यांनी परिश्रम घेतले.
जुन्या कसारा घाटात पिकअपला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 23:50 IST
इगतपुरी : जुना कसारा घाट चढत असताना अचानक पिकअपने पेट घेतला, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. जुन्या ...
जुन्या कसारा घाटात पिकअपला आग
ठळक मुद्देगाडीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक पेट घेतला.