शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या ऑनलाइन  महासभेत फिजिकल गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 13:31 IST

ऑनलाइन महासभेत कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने आणि व्हिडिओ कनेक्टिविटी मिळत नसल्यामुळे आज विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन फिजिकल गोंधळ घातला.  

ठळक मुद्दे नगरसेवकांनी घातला महापौरांच्या दालनात गोँधळ नाशिक महालिकेतील धक्कादायक प्रकार महापालिकेत फिजिकल डिस्टंन्सची ऐशीतैशी

नाशिक -  महापालिकेच्या महत्वपूर्ण विषयांसाठी बोलविण्यात आलेल्या ऑनलाइन महासभेत कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने आणि व्हिडिओ कनेक्टिविटी मिळत नसल्यामुळे आज विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन फिजिकल गोंधळ घातला.  सदरची सभा रद्द करून ती शुक्रवारी कालिदास कला मंदिरात  द्यावी अशी मागणी करताना नगरसेवकांनी अत्यंत आक्रमक रूप धारण केले होते. नाशिक महापालिकेची महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती गेल्यावेळी देखील अशा प्रकारची सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी फारश्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या नव्हत्या. मात्र आजच्या सभेत अत्यंत वादग्रस्त विषय असताना वारंवार तांत्रिक अडचणी आल्याने नगरसेवकांचे न दिसणे आवाजाचा गोंधळ असणे आणि चित्र न दिसणे अशा प्रकारचा गोंधळ सुरू झाला त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ही सभा तहकूब करण्याची मागणी केली मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते शिवसेना गटनेते विलास शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांच्यासह अन्य नगरसेवक महापौर ज्या ठिकाणी सभा संचालन करीत होते असते त्याठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी तेथे गोंधळ घातला वादग्रस्त विषय मंजूर करण्यासाठी जाणीवपूर्वक तांत्रिक अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच गजानन शेलार यांनी महापौरांवर टक्केवारीसाठी सभा बोलावल्याचा आरोप केला शहरात कोरोना मुळे गंभीर स्थिती  असताना अशा प्रकारे सभा बोलावण्याची गरज काय असा प्रश्न त्यांनी केला दरम्यान, अन्य नगरसेवकांनी ही सभा रद्द करून कालिदास कला मंदिर यामध्ये शुक्रवारी सकाळी नियमित वेळेत फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून घ्यावी अशी मागणी केली. हा गोंधळ बघून महापौर सतीश कुलकर्णी यांनी तांत्रिक दुरुस्तीच्या निमित्याने महासभा पंधरा मिनिटांसाठी तहकूब केल्याचे जाहीर केले

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका