शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

फुलेनगरला सराईत गुन्हेगारांकडून घरात घुसून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 01:22 IST

पंचवटी : फुलेनगर नगर परिसरात असलेल्या लक्ष्मण नगर येथे सोमवारी सकाळी भरदिवसा सराईत गुन्हेगारांनी कमरेला पिस्तूल लावून व हातात कोयते घेऊन एका महिलेच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटलेल्या प्रकरणी सहा जणांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहा जण ताब्यात : 6 हजार रुपयांची रोकड लुटली

पंचवटी : फुलेनगर नगर परिसरात असलेल्या लक्ष्मण नगर येथे सोमवारी सकाळी भरदिवसा सराईत गुन्हेगारांनी कमरेला पिस्तूल लावून व हातात कोयते घेऊन एका महिलेच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटलेल्या प्रकरणी सहा जणांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले असून ताब्यात घेतलेल्या सर्वच संशयितांवर शहरातील पोलिस ठाण्यात मारहाण, चोरी, जबरी लूट, दरोडा यासारखे गुन्हे दाखल आहेत.मारहाण व रोकड लूट प्रकरणी सोनी संतोष जाधव या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रशांत अशोक जाधव, योगेश प्रल्हाद लांबाडे, रोहन प्रभाकर निकम, अंकुश भूषण सोनवणे, मयूर वाघमारे व जतिन दिलीप साळुंखे या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वरील संशयितांनी कमरेला बंदूक लावून व हातात धारदार कोयते घेऊन घरात बळजबरीने प्रवेश करत घरात असलेल्या शांता गुंजाळ, गीता गुंजाळ, मेघा जाधव या महिलांना शिवीगाळ व मारहाण केली तसेच फिर्यादी सोनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जाधव यांनी वार चुकवला असता घरातील आरसा फुटला यावेळी फिर्यादीची मावशी राजश्री गुंजाळ या मदतीसाठी आल्यात या संशयितांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण करून दुचाकीवरून पळ काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस