नाशिक : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त गंगापूररोडवरील हार्मनी कलादालनात आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदर्शनात मांडण्यात आलेली छायाचित्रे लक्षवेधी ठरली. या प्रदर्शनात शहरातील सर्व वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेल्या एकापेक्षा एक सरस बातमीमूल्य असलेली बोलकी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती.रविवारी (दि.१९) संध्याकाळी झालेल्या या छायाचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ‘लोकमत’चे छायाचित्रकार नीलेश तांबे, प्रशांत खरोटे, राजू ठाकरे, सोमनाथ कोकरे, चित्रकार बाळ नगरकर, पंकज चांडोले, हेमंत घोरपडे, केशव मते, भूषण पाटील, रघुनंदन मुजूमदार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, राजा पाटेकर आदी उपस्थित होते.
छायाचित्रण दिन : प्रेस फोटोग्राफी प्रदर्शनाने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:10 IST
रविवारी (दि.१९) संध्याकाळी झालेल्या या छायाचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक शाहू खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ‘लोकमत’चे छायाचित्रकार नीलेश तांबे, प्रशांत खरोटे, राजू ठाकरे, सोमनाथ कोकरे, चित्रकार बाळ नगरकर, पंकज चांडोले, हेमंत घोरपडे, केशव मते, भूषण पाटील, रघुनंदन मुजूमदार, ज्ञानेश्वर गांगुर्डे, राजा पाटेकर आदी उपस्थित होते.
छायाचित्रण दिन : प्रेस फोटोग्राफी प्रदर्शनाने वेधले लक्ष
ठळक मुद्देछायाचित्रामागे बातमीमूल्य दडलेले असते. छायाचित्रे न्याहाळण्यासाठी गर्दी